पान ३ : भाजपा सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:06+5:302015-07-03T23:00:06+5:30
विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड यांचा आरोप

पान ३ : भाजपा सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
व जय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड यांचा आरोपमडगाव : भाजपा सरकार विविध कुरापती करून विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मडगावात बोलताना केला.आमदार सरदेसाई व आलेक्स रेजिनाल्ड गाडेवाल्यांच्या सभेत बोलत होते. विरोधी पक्षातील काही मोजकेच आमदार विधानसभेत जनतेच्या हिताशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून आवाज उठवितात. हे बंद करण्याची नवी युक्ती भाजपा सरकारने शोधून काढली असल्याचे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. विरोधी आमदारांचा आवाज बंद करण्यासाठी सरकार पक्षातील सर्व आमदारांना नको असलेले कमी महत्त्वाचे प्रश्न विचारण्यास सांगितले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासाला सहा प्रश्न विचारण्याची भुमा असून सर्व आमदारांनी प्रश्न विचारल्यामुळे चिठ्ठी टाकून प्रश्न काढले जातात. या नव्या पध्दतीमुळे महत्त्वाचे प्रश्न विचारण्याची विरोधी आमदारांना संधी मिळत नसल्याचा स्पष्ट आरोप आमदार रेजिनाल्ड व विजय सरदेसाई यांनी या वेळी केला.सरकार पक्षाने प्रश्न विचारण्याची गरज नसते. खरे म्हणजे जास्त प्रश्न विचारण्याची संधी विरोधकांना दिली पाहिजे. काही मोजकेच अपक्ष उमेदवार व कॉंग्रेसमधील काही मोजकेच आमदार अनेक प्रश्न विचारून सरकार पक्षाला अडचणीचे होत असल्यामुळे सरकार पक्षाने नवी युक्ती काढल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. सभापतींनी अपक्षांना दोन, कॉंग्रेसला दोन व सत्ताधारी पक्षाला दोन प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आपण सभापतींकडे केली असल्याचे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)