पान 2- कुजबूज (मा. संपादकसाहेब)
By Admin | Updated: September 9, 2015 01:42 IST2015-09-09T01:42:34+5:302015-09-09T01:42:34+5:30
शेख सापडले!

पान 2- कुजबूज (मा. संपादकसाहेब)
श ख सापडले!परवा भाजपाचे फातोर्डा येथील नेते दामू नाईक यांच्या पुढाकाराने त्यांच्याच वाढदिवशी मडगावमधील शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी विमा योजना सुरू करण्यात आली. काही शाळांनी ही योजना राबविण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु, दामोदरचे नितीन कुंकळयेकर, मठग्रामस्थ संस्थेचे भाई नायक आदी उपस्थित राहिले. भाई तर भाजपाचे कार्यकारिणी सदस्यच आहेत. परंतु, एका माणसाने मात्र या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतले. ते आहेत काँग्रेसचे नेते एम. के. शेख. शेख एक उच्च माध्यमिक विद्यालय फातोर्डात चालवितात. परंतु, त्यांनी फातोर्डा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. तेथे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. त्या वेळी त्यांच्यावर ते भाजपाचे हस्तक असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ते जे लुप्त झाले होते ते लुईझिन फालेरो प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर पुन्हा अवतीर्ण झाले.लोह खनिज की सोने?भारतीय भूगर्भ अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात गोव्यातील खाण क्षेत्र 750 चौ. किमीवरून दुप्पट झाल्याचे म्हटले आहे व 1200 चौ.मी. क्षेत्रात तर सुवर्णाचे साठे असल्याचेही नोंदविले गेले आहे. परंतु, त्यामुळे गोव्यातील खाणचालकांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती होणार नाही ना? कारण, सोन्याचे साठे असल्याच्या कारणास्तव केंद्राने लोह खनिजाचे उत्खनन थांबविले तर? शिवाय गोव्यातील खनिजाचा आंतरराष्ट्रीय दर उतरल्याचे कारण देऊन खाण कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये खाणी चालू करण्यास नकार दर्शविला होता. आता आयतेच सोने मिळत असेल तर केंद्राने लोह खनिजाच्या उत्खननाची लिजेस तरी का द्यावीत? एक मात्र खरे, आपले गोव्याचे संशोधक नंदकुमार कामत खुश आहेत. सोन्याच्या साठय़ांचा पहिला शोध त्यांनीच तर लावला होता!