पान 2 प?ी - तनुजा धोंड हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:15+5:302015-08-18T21:37:15+5:30
वास्को : बायणा येथील विनायक कला संघाने आयोजित केलेल्या 26 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेतील पहिले बक्षीस केशव आल्त-दाबोळी येथील स्मृती स्कूलची विद्यार्थिनी तनुजा धोंड हिने पटकावले. या शिक्षण संस्थेला फि रता स्मृती चषक बहाल करण्यात आला. स्पर्धा बायणा येथील माता स्कूलमध्ये झाली. स्पर्धेतील दुसरे बक्षीस म्हापसा येथील नेहा बलभीम उपाध्ये, तर तिसरे बक्षीस कुठ्ठाळी येथील विद्या विहार हायस्कूलच्या मीनल नाईक हिला मिळाले.उत्तेजनार्थ बक्षिसे युवक संघ सडा येथील समीक्षा गोरखा, सेंट जोसेफ हायस्कुल वास्कोच्या कुमार दवीक एस़ राव व इस्लामपूर बायणा येथील अंजुमन हिमायतूल इस्लाम हायस्कुलच्या सवित्रा चौधरी हिला देण्यात आल़े बक्षीस वितरण कार्यक्रमास गोवा राज्य जेसीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, महिला व बाल विकास खात्याच्या अधिकारी रूपा महाले, परीक्षक मनोज

पान 2 प?ी - तनुजा धोंड हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश
व स्को : बायणा येथील विनायक कला संघाने आयोजित केलेल्या 26 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेतील पहिले बक्षीस केशव आल्त-दाबोळी येथील स्मृती स्कूलची विद्यार्थिनी तनुजा धोंड हिने पटकावले. या शिक्षण संस्थेला फि रता स्मृती चषक बहाल करण्यात आला. स्पर्धा बायणा येथील माता स्कूलमध्ये झाली. स्पर्धेतील दुसरे बक्षीस म्हापसा येथील नेहा बलभीम उपाध्ये, तर तिसरे बक्षीस कुठ्ठाळी येथील विद्या विहार हायस्कूलच्या मीनल नाईक हिला मिळाले.उत्तेजनार्थ बक्षिसे युवक संघ सडा येथील समीक्षा गोरखा, सेंट जोसेफ हायस्कुल वास्कोच्या कुमार दवीक एस़ राव व इस्लामपूर बायणा येथील अंजुमन हिमायतूल इस्लाम हायस्कुलच्या सवित्रा चौधरी हिला देण्यात आल़े बक्षीस वितरण कार्यक्रमास गोवा राज्य जेसीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, महिला व बाल विकास खात्याच्या अधिकारी रूपा महाले, परीक्षक मनोज पाटील, नागेश सरदेसाई व पल्लवी शिरोडकर उपस्थित होत्या. खजिनदार रवी गोरला यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यक्ष जयंत जाधव यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे यशवंत गडेकर, सूरज वाघमोडे यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)