पान 2 - राज्य सहकारी बँकेचा एकूण तोटा 45 कोटींवर! -2014-15 आर्थिक वर्षात 8 कोटी तोटा
By admin | Updated: September 14, 2015 00:39 IST
- आमसभेत विषय गाजला
पान 2 - राज्य सहकारी बँकेचा एकूण तोटा 45 कोटींवर! -2014-15 आर्थिक वर्षात 8 कोटी तोटा
- आमसभेत विषय गाजला- चेअरमन म्हणतात, खाण अवलंबितांच्या थकित कर्जामुळे एनपीए वाढलापणजी : राज्य सहकारी बँकेला आर्थिक वर्षात तब्बल 8 कोटी रुपये तोटा झाला असून आजपर्यंतचा एकूण तोटा 45 कोटी रुपयांवर पोचला आहे. यात भर म्हणून दमण-दिव शाखा वेगळी केल्यास 200 कोटींच्या ठेवींना मुकावे लागणार आहे. एकंदर आर्थिक स्थिती पाहता राज्य सहकारी बँकेची वाटचालही म्हापसा अर्बन आणि मडगाव अर्बन बँकेच्या दिशेनेच चालू आहे. बँकेच्या रविवारी झालेल्या आमसभेत वरील बाब उघड झाली. आमसभेनंतर बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता खाण अवलंबित ट्रकवाले तसेच इतरांचे 80 कोटी रुपये कर्ज थकले असल्याचे सांगून तोट्याचे तेही एक कारण असल्याचे स्पष्ट केले. तीन वर्षे उलटल्याने हे कर्ज शंभर टक्के बिगर उत्पादक मालमत्ता (एनपीए) दाखवावे लागले आहे, असे ते म्हणाले. दमण दिवच्या शाखेबाबत विचारले असता एक चतुर्थांश ठेवी तेथे आहेत आणि शाखा वेगळी केल्यास त्याचा परिणाम बँकेवर होईल, हे त्यांनी मान्य केले. 45 कोटींच्या आजपर्यंतच्या एकूण लक्षणीय तोट्याबद्दल विचारले असता आपण सूत्रे हाती घेण्याआधी सात-आठ वर्षांत बँकेची स्थिती काय होती, हे लोकांनी पाहिले आहे. हा तोटा आधीचा आहे, असे फळदेसाई म्हणाले. ........- रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार कर्ज तीन महिने थकल्यास 10 टक्के एनपीए दाखवावा लागतो, तर तीन वर्षांपर्यंत थकल्यास 100 टक्के एनपीए दाखवावा लागतो. खाण अवलंबित ट्रकवाले, मशिनमालक यांनी घेतलेले कर्ज न फेडल्याने ते एनपीए म्हणून दाखवावे लागले आहे. ............दमण-दिवची शाखा वेगळी करणार बँक सुस्थितीत येण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असे विचारले असता थकित कर्जवसुलीसाठी पावले उचललेली आहेत. जिल्हाधिकार्यांच्या मदतीने मालमत्ता जप्त करण्याबाबतही काही करता येईल का, याची चाचपणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दमण दिवची शाखा वेगळी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येत्या डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि त्यानुसार नाबार्डमार्फत प्रक्रिया सुरू आहे. तत्पूर्वी आमसभेत बँकेच्या आर्थिक स्थितीवर जोरदार चर्चा झाली. खर्चावर नियंत्रण आणावे तसेच कर्मचार्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी पावले उचलावीत, असे भागधारकांनी सुचविले. उदय प्रभू, प्रदीप नाईक, एम. डी. देसाई आदी भागधारकांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. विरोधी गटातील संचालक रामचंद्र मुळे, संजय देसाई आदींनी व्यासपीठावर बसण्याऐवजी भागधारकांबरोबर खालीच बसणे पसंत केले. (प्रतिनिधी)