पान २ : पाळीतून अपक्ष उमेदवार शुभेच्छा शांबा गावस विजयी
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:06+5:302015-03-20T22:40:06+5:30
डिचोली : पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात शुभेच्छा शांबा गावस या अपक्ष उमेदवार आपल्या निकट प्रतिस्पर्धी भाजपच्या मनीषा मंगलदास गावस यांच्यावर १०८३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. शुभेच्छा गावस यांना ५६०९ मते मिळाली, तर मनीषा गावस यांना ४५२६ मते मिळाली. लीना लक्ष्मीकांत परब यांना ४१० मते मिळाली.

पान २ : पाळीतून अपक्ष उमेदवार शुभेच्छा शांबा गावस विजयी
ड चोली : पाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात शुभेच्छा शांबा गावस या अपक्ष उमेदवार आपल्या निकट प्रतिस्पर्धी भाजपच्या मनीषा मंगलदास गावस यांच्यावर १०८३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. शुभेच्छा गावस यांना ५६०९ मते मिळाली, तर मनीषा गावस यांना ४५२६ मते मिळाली. लीना लक्ष्मीकांत परब यांना ४१० मते मिळाली.हा विजय समस्त कार्यकर्त्यांचा असून जिल्हा पंचायत सदस्य या नात्याने मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहणार असल्याचे शुभेच्छा गावस यांनी सांगितले.मयेतून भाजपचे शंकर चोडणकर विजयीमये जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपचे शंकर अनंत चोडणकर हे ४३०० मते घेऊन विजयी झाले. सुभाष किनळकर यांना १९३६, रूपेश ठाणेकर यांना १४४८, मेघना येंडे यांना ९४२, संतोष भोसले यांना ७७८, अमृत कवठणकर यांना ७७७, तर चंद्रेश कवठणकर यांना ५५२ मते मिळाली. (लो.प्र.)फोटो : १) पाळी मतदारसंघातून विजयी झालेल्या शुभेच्छा गावस कार्यकर्त्यांसह. (छाया : दुर्गादास गर्दे)२) मये मतदारसंघातून विजयी झालेले शंकर चोडणकर. सोबत उपसभापती अनंत शेट, आमदार प्रमोद सावंत व इतर कार्यकर्ते. (छाया : दुर्गादास गर्दे)