पान २ : ताळगावचे रस्ते दुरुस्त करा
By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30
ताळगावचे रस्ते दुरुस्त करा

पान २ : ताळगावचे रस्ते दुरुस्त करा
त ळगावचे रस्ते दुरुस्त करामंत्र्यांना निवेदनपणजी : ताळगाव मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा झाली असून वाहनधारकांना व अन्य लोकांनाही त्यापासून खूप त्रास होत आहे. हे रस्ते दुरुस्त केले जावेत, अशी मागणी करणारे निवेदन ताळगाव ग्रामस्थ संघटनेच्या वतीने शुक्रवारी बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना सादर करण्यात आले.ताळगावमधील रस्त्यांची पाहणी करून त्वरित ते रस्ते हॉटमिक्स केले जावेत, तसेच प्रत्येक इमारत व घराला मलनिस्सारण व्यवस्थेची जोडणी दिली जावी, अशी मागणी सॅबेस्त्यांव डिकॉस्ता, राजकुमार नाईक, ज्यो डिकॉस्ता, रोहिदास नाईक आदी नागरिकांनी केली. ताळगावमधील रस्त्यांवर दुचाकी किंवा चारचाकी चालविणे हे जवळजवळ अशक्य बनलेले आहे. सरकारने रस्ते दुरुस्त केले नाही तर नागरिक आंदोलनही करतील, असे निवेदनात म्हटले आहे.(खास प्रतिनिधी)(जागा असेलच तर फोटो वापरावा...कॅप्शन--ताळगावच्या रस्त्यांची दुरवस्था दाखविणारे निवेदन मंत्र्यांना सादर केलेले नागरिक.)