पान २ : पावसाची दडी डास पैदासीला पोषक

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:22+5:302015-07-16T15:56:22+5:30

- बंदर कप्ताननेही उचलली पावले : बोटी, बार्जेस, ट्रॉलर्सना हौद्यात पाणी साचू न देण्याचे निर्देश

Page 2: Rainfall Due to Dissase Breeding | पान २ : पावसाची दडी डास पैदासीला पोषक

पान २ : पावसाची दडी डास पैदासीला पोषक

-
ंदर कप्ताननेही उचलली पावले : बोटी, बार्जेस, ट्रॉलर्सना हौद्यात पाणी साचू न देण्याचे निर्देश
पणजी : पावसाने दडी मारल्याने बदललेले वातावरण डास पैदासीसाठी पोषक असून करवंट्या टायर तसेच उघड्यावरील अन्य वस्तूंमध्ये पाणी साचू न देण्याची काळजी लोकांनी घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याकडून केले जात आहे. दुसरीकडे बंदर कप्तान खात्याने बोटमालक, बार्जमालक, ट्रॉलरवाले यांना हौद्यात पाणी साचू देऊ नये, असे निर्देश दिलेले आहेत.
दोनापावल जेटी, हवाई बीच, आयवांव भागातील बोटी उघड्या आढळून आल्याने त्या झाकून ठेवण्यास बजावले आहे. या बोटींमध्ये पावसाचे पाणी साचून डासनिर्मिती होण्याचा धोका आहे. गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या कलम ३७ अन्वये तसे करण्यास मनाई आहे.
शिपयार्ड किंवा डॉकयार्डमध्ये असलेल्या बार्जेस, जलसफरी करणार्‍या पर्यटक बोटी या सर्वांना हे निर्देश लागू आहेत.
आरोग्य खात्यातील साथीच्या रोगाच्या विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत परब यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोनापावल भागात तसा मलेरियाचा फैलाव आढळून आलेला नाही. एखाद दुसरा मलेरिया रुग्ण असेल याचा अर्थ तेथे फैलाव झालेला आहे, असे नाही. सध्या कोरडे दिवस आणि उष्मा वाढल्याने डास पैदासीसाठी हे वातावरण अत्यंत पोषक आहे त्यामुळे डास पैदास होऊ शकते.
मलेरिया नियंत्रणात असल्याचा तसेच एकाच विशिष्ट भागात साथीचा प्रभाव आहे, असेही काही आढळून आलेले नाही, असा दावा परब यांनी केला. एखाद दुसरा रुग्ण आढळला असेल त्याला त्या भागात साथीचा फैलाव झाला, असे म्हणता येणार नसल्याचे मत परब यांनी व्यक्त केले.
राज्यात प्लाझ्मोडियम व्हायवेक्स आणि फाल्सिपेरम असे दोन प्रकारचे मलेरिया रुग्ण आढळतात. या साथी पसरविणारे डासही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फाल्सिपेरम जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे लोकांनी डास पैदास होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नयेत, असे आवाहन आहे.
परब पुढे म्हणाले, याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाते, त्याचबरोबर अन्य उपाययोजनाही केल्या जातात. साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी डास पैदास होऊ नये यासाठी फॉगिंग केले जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2: Rainfall Due to Dissase Breeding