पान २ : म्हादईप्रश्नी अंतिम सुनावणी सुरू

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:21+5:302015-07-16T15:56:21+5:30

म्हादईप्रश्नी अंतिम

Page 2: Mhadei questions start the final hearing | पान २ : म्हादईप्रश्नी अंतिम सुनावणी सुरू

पान २ : म्हादईप्रश्नी अंतिम सुनावणी सुरू

हादईप्रश्नी अंतिम
सुनावणी सुरू
पणजी : गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सुरू असलेल्या म्हादई पाणी तंटाप्रकरणी सुनावणी आता नव्याने सुरू झाली आहे. ही सुनावणी बुधवारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. लवादाने गोवा व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या बाजू व युक्तिवाद ऐकून घेतले आहेत. आता पुरावे व साक्षी नोंद केल्या जाणार आहेत. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
गोव्याचे ॲडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वकिलांचा समूह दिल्लीत आहे. म्हादई पाणी तंट्याशीसंबंधित पर्यावरणविषयक व जैवविविधता आणि जैवसंपदाविषयक मुद्देही लवादाने विचारात घ्यावेत, अशी विनंती गोव्याने केली आहे. अनेक महत्त्वाचे साक्षीदार गोवा सरकार लवादासमोर उभे करणार आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Page 2: Mhadei questions start the final hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.