पान 2 - दक्षता खात्यातील पदे भरू : पार्सेकर
By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:45:09+5:302015-08-11T23:45:09+5:30
पणजी : दक्षता खात्यात जी पदे रिक्त आहेत, ती भरली जातील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनीही काही उपप्रश्न सादर केले. दक्षता खात्यातील पदे भरण्याची प्रक्रिया बराच काळ सुरू आहे. यामुळे तिथे असलेल्या तक्रारींची तड लवकर लागत नाही. अजून बांधकाम खात्याच्या काही कंत्राटदारांना बिले मिळालेली नाहीत; कारण कामाच्या फाईल्स दक्षता खात्याकडे तशाच पडून आहेत, असे काब्राल म्हणाले. या खात्याकडे अनेक बोगस तक्रारीही येतात. तक्रारदार अस्तित्वात नसला तरी, त्या तक्रारी निर्णयाविना तशाच उरतात, असे आमदार सावंत म्हणाले. काही अधिकारी एकमेकास बदनाम करण्यासाठीही तक्रारी करतात, असे ते म्हणाले.

पान 2 - दक्षता खात्यातील पदे भरू : पार्सेकर
प जी : दक्षता खात्यात जी पदे रिक्त आहेत, ती भरली जातील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी याबाबतचा मूळ प्रश्न मांडला होता. साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनीही काही उपप्रश्न सादर केले. दक्षता खात्यातील पदे भरण्याची प्रक्रिया बराच काळ सुरू आहे. यामुळे तिथे असलेल्या तक्रारींची तड लवकर लागत नाही. अजून बांधकाम खात्याच्या काही कंत्राटदारांना बिले मिळालेली नाहीत; कारण कामाच्या फाईल्स दक्षता खात्याकडे तशाच पडून आहेत, असे काब्राल म्हणाले. या खात्याकडे अनेक बोगस तक्रारीही येतात. तक्रारदार अस्तित्वात नसला तरी, त्या तक्रारी निर्णयाविना तशाच उरतात, असे आमदार सावंत म्हणाले. काही अधिकारी एकमेकास बदनाम करण्यासाठीही तक्रारी करतात, असे ते म्हणाले.उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारने दक्षता खात्याला पुरेसे मनुष्यबळ दिले आहे. आम्हीच हे खाते मजबूत केले आहे. या खात्यात ज्या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली, ती पदेही भरली जातील. या खात्याचे संचालक चांगल्या प्रकारे काम करतात. कुणीच अधिकारी किंवा कर्मचारी या खात्यात नियुक्तीवर जाऊ पाहत नाहीत. दुसर्याशी उगाच वाईटपण नको, असा विचार करतात. काही तक्रारी निवावी किंवा खोट्या नावाने येतात हे खरे असले तरी, अशी प्रत्येक तक्रार बोगसच असते असेही म्हणता येत नाही. काहीवेळा तक्रारींमध्ये तथ्यही असते. त्यांची चौकशी केली जाते.(खास प्रतिनिधी)