पान 2 - डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने सांत इस्तेव्हमध्ये चिंता
By Admin | Updated: August 11, 2015 23:45 IST2015-08-11T23:45:09+5:302015-08-11T23:45:09+5:30
माशेल : सांत इस्तेव्ह पंचायत क्षेत्रातल्या परिसरात रेती उपसा करणारे परप्रांतीय मजूर मोठय़ा संख्येने आहेत. इथे डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्याच्या छायेत आहे, हे स्पष्ट होत आहे. यासाठी संबंधित कंत्राटदारांनी मजुरांचे आरोग्य कार्ड करणे गरजेचे आहे. तरच ही समस्या सुटू शकेल, असे मत बेतकी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओसवाल्ड फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

पान 2 - डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने सांत इस्तेव्हमध्ये चिंता
म शेल : सांत इस्तेव्ह पंचायत क्षेत्रातल्या परिसरात रेती उपसा करणारे परप्रांतीय मजूर मोठय़ा संख्येने आहेत. इथे डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्याच्या छायेत आहे, हे स्पष्ट होत आहे. यासाठी संबंधित कंत्राटदारांनी मजुरांचे आरोग्य कार्ड करणे गरजेचे आहे. तरच ही समस्या सुटू शकेल, असे मत बेतकी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओसवाल्ड फर्नांडिस यांनी व्यक्त केले.सांत इस्तेव्ह येथे सांत इस्तेव्ह पंचायत व बेतकी आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने या पंचायत क्षेत्रातल्या नागरिकांसाठी डेंग्यू विरोधी जागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी फर्नांडिस सेंट तेरेजा हायस्कूल सभागृहात बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सांत इस्तेव्हचे सरपंच नोलास्को मिनेझिस, उपसरपंच सॅबरीना परेरा, बेतकी आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सॅलिना नोरान्हो, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोथेलो, मुख्याध्यापिका सिक्लेरिना गोन्साल्वीस उपस्थित होत्या.