पान-२ बिठ्ठोणमध्ये नियमांचे उल्लंघन करून सुरु केलेले बांधकाम अधिकारी/ग्रामस्थांनी बंद पाडले

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:07+5:302014-12-23T00:04:07+5:30

बिठ्ठोणमध्ये नियमांचे उल्लंघन करून सुरू केलेले

Page 2 Building Construction Officer / Villagers started by violating the rules in the statue | पान-२ बिठ्ठोणमध्ये नियमांचे उल्लंघन करून सुरु केलेले बांधकाम अधिकारी/ग्रामस्थांनी बंद पाडले

पान-२ बिठ्ठोणमध्ये नियमांचे उल्लंघन करून सुरु केलेले बांधकाम अधिकारी/ग्रामस्थांनी बंद पाडले

ठ्ठोणमध्ये नियमांचे उल्लंघन करून सुरू केलेले
बांधकाम अधिकारी/ग्रामस्थांनी बंद पाडले
पर्वरी : परवानगीविना बिठ्ठोण येथील चार मानसीलगत कांदळवनाची कत्तल करून जमिनीचा भराव टाकण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. संतप्त ग्रामस्थांनी या बांधकामास विरोध करून कारवाईची मागणी केली. तशी तक्रार त्यांनी आमदार रोहन खंवटे यांच्याकडे केली. त्यांनी त्वरित संबंधित अधिकार्‍यांसह जागेची पाहणी केली. उपजिल्हधिकार्‍यांनी तूर्तास काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी उपस्थित सर्व अधिकारिणीच्या अधिकार्‍यांनी कलम १७ अन्वये पोलीस तक्र ार नोंदविण्यात येणार असल्याचे सांगितले.
वन खाते, सीआर झेड, बंदर कप्तान, जलस्रोत, किंवा भू संवर्धन या अधिकारिणीचे परवाने न घेता माईल स्टोन प्रॉपर्टी या कंपनीचे मालक अडवाणी यांनी चार मानस येथील कांदळवनाची कत्तल करून सुमारे ३५० मीटर जागेवर मातीचा भराव टाकला होता. त्यामुळे खाडीचे पाणी अडविले असल्याचे दिसून आले. आमदार खंवटे यांनी उपजिल्हाधिकारी साबाजी शेटये, मामलेदार दशरथ गावस, वन, बंदर कप्तान आणि जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍याना स्थळावर बोलावून हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. यापैकी एकाही अधिकारिणीने परवाना दिला नसल्याचे अधिकार्‍यांनी आमदार खंवटे यांना सांगितले.
साल्वादोर दु मुंद पंचायतीच्या अखत्यारित असलेल्या सर्व्हे क्र . ५८/१, १४/२, १४/३ व १४/५ या जलभागावर ही झाडे कापून मातीचा भराव टाकण्याचे काम नुकतेच सुरू केले होते. माईलस्टोन कंपनीचे मालक यांना विचारले असता त्यांनी साल्वादोर दु मुंद पंचायतीने तात्पुरता ना हरकत दाखला दिल्याचे सांगितले. अधिक चौकशी करता या जागेवर फ्लोटिंग जेट्टी बांधण्याचे प्रयोजन असल्याचे समजते. सरपंच राजेश सावईकर यांनी मंगळवार दि. २३ रोजी ना हरकत दाखला रद्द करण्याचे आश्वासन या वेळी उपस्थिताना दिले. या वेळी ग्रामस्थ आणि पोलीसही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो : मातीचा भराव टाकलेल्या जागेची ग्रामस्थांसह पाहणी करताना आमदार रोहन खंवटे व अधिकारी. (छाया : शेखर वायंगणकर)

Web Title: Page 2 Building Construction Officer / Villagers started by violating the rules in the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.