पान 2 - क्रीडा खात्याच्या कामगारांचे उपोषण मागे

By Admin | Updated: August 11, 2015 23:22 IST2015-08-11T23:22:31+5:302015-08-11T23:22:31+5:30

पणजी : आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी उपोषण मागे घेतले. क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सोमवारी आझाद मैदानावर भेट देऊन कामगारांना आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी कामगारांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, येणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला गेला नाही तर सर्व क्रीडा कामगार पुन्हा उपोषणाला बसतील, असे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Page 2 - Back to the fasting workers of the sports department | पान 2 - क्रीडा खात्याच्या कामगारांचे उपोषण मागे

पान 2 - क्रीडा खात्याच्या कामगारांचे उपोषण मागे

जी : आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या क्रीडा खात्याच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी उपोषण मागे घेतले. क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सोमवारी आझाद मैदानावर भेट देऊन कामगारांना आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी कामगारांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, येणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला गेला नाही तर सर्व क्रीडा कामगार पुन्हा उपोषणाला बसतील, असे कामगार नेते अजितसिंग राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
गेल्या दहा महिन्यांपासून सेवेतून कमी केलेल्या 145 कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात यावे म्हणून कामगार गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. सोमवारी क्रीडा खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी कामगारांची भेट घेऊन, फेरभरतीचे कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याविषयी निर्णय होईल. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे क्रीडा खाते कर्मचार्‍यांची भरती करून घेणार असल्याचे आश्वासन दिले. मंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनावर विश्वास ठेवून कामगारांनी उपोषण मागे घेतले असल्याचे सांगितले.
क्रीडा कर्मचारी शेवोरिटो डिकॉस्ता यांनी गेले चार दिवस उपोषण केले. त्यांच्यासमवेत इतर कामगारांनीही साखळी उपोषण केले. मंत्रिमंडळात मंजुरीसाठी देण्यात येणार्‍या प्रस्तावात कामगारांचा पगार मासिक 14 हजार रुपये करण्यात आला आहे. मंत्री तवडकर यांनी कामगारांच्या समस्येची दखल घेऊन त्वरित आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांच्या आश्वासनावर विश्वास असून 145 कामगारांपैकी अत्यंत आवश्यकता असलेल्या 75 कामगारांना त्वरित सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2 - Back to the fasting workers of the sports department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.