पान 2- गोवा प्रवेशबंदी आदेशास प्रमोद मुतालिक यांचे सुप्रीम कोर्टात अव्हान
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:59+5:302015-08-26T00:18:59+5:30
पणजी : गोवा प्रवेशास बंदी घालणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ आदेशास र्शीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

पान 2- गोवा प्रवेशबंदी आदेशास प्रमोद मुतालिक यांचे सुप्रीम कोर्टात अव्हान
प जी : गोवा प्रवेशास बंदी घालणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ आदेशास र्शीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.हायकोर्ट आदेशास स्थगितीची मागणी त्यांनी केली आहे. फौजदारी दंड संहितेच्या 144 कलमाखाली गोवा सरकारने जारी केलेला प्रतिबंधक आदेश बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला असून हायकोर्टाने आपले म्हणणे ऐकून घेतलेले नसल्याचे म्हटले आहे.हायकोर्टाचा आदेश मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे, असा दावाही केला आहे. गोवा सरकार व दोन्ही जिल्हाधिकार्यांचा आदेश बेकायदा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकार्यांनी प्रवेशबंदीचा पहिला आदेश गतसाली 19 ऑगस्ट रोजी काढला. तो 60 दिवसांचा होता. त्यानंतर कालांतराने मुदत वाढवत गेली. (प्रतिनिधी)