पान १ - शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

(टीप - या बातमीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया थोड्या वेळाने पाठविण्यात येईल़ -सेंट्रल डेस्क)

Page 1 - Teacher's suicide in the name of education minister! | पान १ - शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!

पान १ - शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!

(ट
ीप - या बातमीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया थोड्या वेळाने पाठविण्यात येईल़ -सेंट्रल डेस्क)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
फोटो12ल्लस्रँिीू 30 व 26
शिक्षणमंत्र्यांच्या नावाने शिक्षकाची आत्महत्या!
राज्यातील पहिला बळी : नियुक्तीचा आदेश रद्द झाल्याने नैराश्यातून कृत्य
नांदेड : नियुक्तीचे आदेश रद्द झाल्याने बेरोजगार झालेल्या हताश अंशकालीन कलाशिक्षकाने त्यासाठी थेट शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरत आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली़ सय्यद रमिजोद्दीन (वय २४) असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे़ मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांना जबाबदार धरले़ या दोघांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारातच नातेवाइकांनी मृतदेहासह दोन तास ठिय्या दिला़ त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
२०१२-१३ मध्ये सय्यद यांची अंशकालीन कलाशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती़ पुढे अंशकालीन शिक्षक हे केंद्र शासनाच्या योजनेनुसार नेमण्यात आले होते़ त्यांचे नियुक्तीचे आदेश रद्द झाल्याने तणावातून गुरुवारी रात्री त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह घरी आणून अंत्यसंस्काराची तयारीही सुरू करण्यात आली होती़; परंतु मृत सय्यद यांच्या खिशात चिठ्ठी सापडल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी अंत्ययात्रा थेट इतवारा पोलीस ठाण्यात आणली़ या चिठ्ठीच्या आधारे नातेवाइकांनी शिक्षणमंत्री व शिक्षण सचिवावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली़ यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

Web Title: Page 1 - Teacher's suicide in the name of education minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.