पान १- राष्ट्रपतींच्या पत्नी शुभ्रा यांचे निधन मान्यवरांच्या शोकसंवेदना : लष्करी रुग्णालयात सुरू होते उपचार
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि रवींद्र संगीत गायिका शुभ्रा मुखर्जी यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च ॲन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय)त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

पान १- राष्ट्रपतींच्या पत्नी शुभ्रा यांचे निधन मान्यवरांच्या शोकसंवेदना : लष्करी रुग्णालयात सुरू होते उपचार
द वेंद्र फडणवीस : घरांना सवलती देण्यासाठी धोरण ठरविणारसोलापूर : सोलापूर शहर स्मार्ट करताना गरिबांच्या वसाहतींना विविध सुविधा देऊन स्मार्ट करू तसेच गरिबांच्या घरांना सवलती देण्यासाठी महिनाभरात धोरण ठरवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ गरिबांच्या पाठीशी शासन असल्याचेही ते म्हणाले़ कुंभारी येथील मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे ५,१०० घरे बांधण्यात येत असून त्यातील १,६०० घरांचे हस्तांतरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय कामगार मंत्री बंडारु लक्ष्मण, खा़ तपन सेन कार्यक्रमाला उपस्थित होते़मुख्यमंत्री म्हणाले, राज्यभरातच एक धोरण ठरवून गरीबांना कमी खर्चात घरे मिळतील याचा विचार केला जाईल़ या गरीबांच्या वसाहतीमध्ये ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी विविध सुविधा देऊन त्या स्मार्ट केल्या जातील़ स्मार्ट सोलापूर करताना गोरगरीब, दलित, आदीवासी कुटुंबामध्ये परिवर्तन झाले पाहिजे़ त्यामुळे शहरे स्मार्ट करताना गरीबांना प्राधान्य देऊ. गरीबांना घरे बांधून देण्यासाठी जे कोणी पुढाकार घेतील त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)