पान १- आयएनएस सिंधुरत्न अग्निकांडाबद्दल नौदल अधिकार्याचे कोर्ट मार्शल
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
नवी दिल्ली : गेल्या वर्षी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला लागलेल्या आगीच्या संदर्भात बाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरचे कोर्ट मार्शल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अन्य सहा अधिकार्यांना दोषी ठरविण्यात आले असून निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला मुंबईच्या समुद्र किनार्याजवळ आयएनएस सिंधुरत्नला आग लागली होती. त्यानंतर तत्कालीन नौदल प्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता.

पान १- आयएनएस सिंधुरत्न अग्निकांडाबद्दल नौदल अधिकार्याचे कोर्ट मार्शल
न ी दिल्ली : गेल्या वर्षी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला लागलेल्या आगीच्या संदर्भात बाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरचे कोर्ट मार्शल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अन्य सहा अधिकार्यांना दोषी ठरविण्यात आले असून निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला मुंबईच्या समुद्र किनार्याजवळ आयएनएस सिंधुरत्नला आग लागली होती. त्यानंतर तत्कालीन नौदल प्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता.नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्ड ऑफ इन्क्वायरीची शिफारस नौदल मुख्यालयाने स्वीकृत केली आहे. त्यात आयएनएस सिंधुरत्नचे कमांडिंग ऑफिसर संदीप सिन्हा यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शल कारवाई करण्याची तर अन्य सहा नौदल अधिकार्यांना निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल नोटीस जारी करण्यात आली आहे. वेस्टर्न नेवल कमांडतर्फे सिन्हा यांच्याविरुद्धच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि आपला बचाव करण्याची संधी त्यांना मिळेल.निष्काळजीपणाचे पत्र मिळणे म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण देताना या सूत्रांनी सांगितले की, या सहा अधिकार्यांना पुढचे दोन वर्षेपर्यंत कोणत्याही प्रकारची पदोन्नती मिळणार नाही आणि त्यांना अभ्यासक्रमात किंवा विदेशात पदस्थापित केले जाणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)