पान १ - आयआयटी
By Admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:41+5:302014-12-03T22:35:41+5:30
दीपालीला फेसबुकककडून

पान १ - आयआयटी
द पालीला फेसबुकककडून१ कोटी ४२ लाखांची ऑफरपाच जणांची निवड : आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे पगार कोटींच्या घरातमुंबई : फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सने मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकने मुंबई आयआयटीच्या दीपाली अडलखा, वेदरत्न दीक्षित, रोहन दास, आस्था अग्रवाल आणि राहुल सिंघल या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, दीपाली अडलखा या विद्यार्थिनीला फेसबुकने चक्क वार्षिक १ कोटी ४२ लाखांची नोकरी देऊ केली आहे.आयआयटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ब्लॅकस्टोन, सॅमसंग, ओरॅकल, लिंक्डइन, मॉर्गन स्टॅन्ले आणि शेलसारख्या नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तब्बल ३७ कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांमधील टॉपर्सच्या मुलाखती घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी पहिल्या दिवशी ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. या वर्षी मुलाखतींचा आकडा ५५० वर पोहोचला. विद्यार्थीवर्गाला प्रत्येकी ८० अर्ज करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. परिणामी प्रत्येक कंपनीकडे दाखल होणार्या अर्जांची संख्या घटून ती ८००हून ३०० वर आली होती.मुंबई आयआयटीमधून सर्वाधिक रकमेच्या पगाराची नोकरी पटकावणार्या दीपाली अडलखा हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, फेसबुकने माझे सोमवारी तब्बल प्रत्येकी एक तासाचे तीन इंटरव्ह्यू घेतले. त्यात विचारण्यात आलेले प्रश्न साधे, सोपे आणि सरळ असले तरी गोंधळात घालणारे होते. या मुलाखतींनंतर त्यांनी माझी निवड केली. माझा पगार वार्षिक १ कोटी ४२ लाख असला तरी बेसिक पेमेंट ६५ लाख एवढे आहे. (प्रतिनिधी)----विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार्या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची संख्या अधिक असून, पहिल्या पंधरावड्यात मुलाखतींचा पहिला टप्पा होणार आहे.