शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

पान १- एफटीआयआय

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

पुण्यात पाच विद्यार्थ्यांच्या अटकेने एफटीआयआयचा वाद चिघळला राहुल गांधींचे टीकास्त्र : केजरीवालांची नव्याने उडीनवी दिल्ली/पुणे : सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत फिल्म ॲण्ड टेलीव्हीजन इन्स्टट्यिूट(एफटीआय)च्या ३०-३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांनी मंगऴवारी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून पाच विद्यार्थ्यांना अटक केल्याने हा ...


पुण्यात पाच विद्यार्थ्यांच्या अटकेने एफटीआयआयचा वाद चिघळला
राहुल गांधींचे टीकास्त्र : केजरीवालांची नव्याने उडी
नवी दिल्ली/पुणे : सरकारी कामात अडथळा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप ठेवत फिल्म ॲण्ड टेलीव्हीजन इन्स्टट्यिूट(एफटीआय)च्या ३०-३५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांनी मंगऴवारी मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये शिरून पाच विद्यार्थ्यांना अटक केल्याने हा वाद चिघळला आहे. पुण्यातील या घटनेचे तीव्र पडसाद दिल्लीतील राजकीय गोटात उमटले. काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सरकारविरुद्ध सोशल मीडियावरून टीकास्त्र सोडले, तर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची पाठराखण करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या वादात नव्याने उडी घेतली आहे.
अटकेच्या कारवाईनंतर फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टट्यिूट ऑफ इंडियामधील (एफटीआय) विद्यार्थी विरुद्ध व्यवस्थापन यांच्यातील वाद आणखी चिघळला असून विद्यार्थ्यांच्या अरेरावी वर्तनामुळे पोलिसांना बोलवावे लागल्याचा दावा संचालक प्रशांत पाठराबे यांनी केला; तर पाठराबे यांनीच पोलिसांना बोलावून गोंधळ घातला, असा विद्यार्थ्यांचा आरोप आाहे. या घटनेने तब्बल ६८ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला निराळे वळण लागले आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनीही तीव्र नाराजी नोंदविली आहे. मोदीजी, ( एफटीआयआयचे) हे विद्यार्थी गुन्हेगार नाहीत. गप्प करा,निलंबित करा व अटक करा हाच मोदींच्या अच्छे दिन चा मंत्र आहे अशा ट्विटमधून राहुल यांनी सरकारवर टीका केली . गेल्या महिन्यात त्यांनी स्वत: पुण्यात येऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता.
-----------
अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची निवड गुणवत्तेवर झाला नसल्याचा आरोप करत त्यांच्यासह नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
------------
पाठराबे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी कारवाईचे समर्थन केले. संस्थेच्या व्यवस्थापन समितीनेच २००८च्या विद्यार्थ्यांचे रखडलेले प्रोजेक्ट त्वरित सादर करून घेण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला व कार्यालयाची तोडफोडही केली. त्यामुळे पोलिसांकडे फिर्याद दाखल करावी लागली, असा दावा पाठराबे यांनी केला.
-------------
अटक झालेल्या पाचही विद्यार्थ्यांची न्यायालयाने ३ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. तर १२ विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
--------
केजरीवाल सरसावले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदेलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यांचे वर्ग सुरू व्हावेत यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करू देण्याची तयारी केजरीवाल यांनी दर्शवली आहे.
एफटीआयआयच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेऊन केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाची ही संस्था उद्धवस्त करीत आहे. केंद्र सरकारने जर ऐकलेच नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना कायमची जागा देऊ असे टष्ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.