पान १ - जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:19+5:302014-12-20T22:27:19+5:30

जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

Page 1 - Extension of JEE's main examination application | पान १ - जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

पान १ - जेईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ

ईईच्या मुख्य परीक्षा अर्जास मुदतवाढ
तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय : २६ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
मुंबई : अभियांत्रिकी आणि आयआयटीच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्‍या जॉईण्ट इंजिनिअरींग एण्ट्रन्स एक्झाम (जेईई) मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यास राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अर्ज भरण्यास तंत्र शिक्षण संचालनालयाने २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची मुदत १८ डिसेंबरपर्यंत होती.
२०१५-१६ या शैक्षणिक वर्षाकरिता राज्यातील चार वर्षे कालावधीच्या अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र पदवी अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश जेईई मुख्य परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत़
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात येणारी जेईई मुख्य परीक्षा पेन ॲण्ड पेपर बेस्ड परीक्षा ४ एप्रिल रोजी आणि १० ते ११ एप्रिल २०१५ रोजी कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 1 - Extension of JEE's main examination application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.