पान १ : १४ खाणींची तपासणी आठवड्याभरात - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ३0 खाणींची तपासणी पूर्ण

By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:55+5:302015-06-02T00:03:55+5:30

पणजी : लिज नूतनीकरण झालेल्या खाणींपैकी उर्वरित १४ खाणींची तपासणी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या आठवड्यात करणार आहे. ३0 खाणींची तपासणी पूर्ण झालेली आहे.

Page 1: 14 Checking of mines within a week - Complete 30 inspection checks from State Pollution Control Board | पान १ : १४ खाणींची तपासणी आठवड्याभरात - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ३0 खाणींची तपासणी पूर्ण

पान १ : १४ खाणींची तपासणी आठवड्याभरात - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ३0 खाणींची तपासणी पूर्ण

जी : लिज नूतनीकरण झालेल्या खाणींपैकी उर्वरित १४ खाणींची तपासणी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या आठवड्यात करणार आहे. ३0 खाणींची तपासणी पूर्ण झालेली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जुझे नोरोन्हा यांना विचारले असता ते म्हणाले की, लिज नूतनीकरण झालेल्या प्रत्येक खाणीला जल व हवा प्रदूषण कायद्याखाली दाखले प्राप्त करावे लागणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सरकारने एकूण ६१ खाणींचे लिज नूतनीकरण केलेले आहे. पैकी ४४ खाणींची तपासणी केली जाणार आहे. १७ खाणींबाबत गोवा फाउंडेशन संघटनेने प्रश्न उपस्थित केला असून १२ जानेवारी रोजी एमएमडीआर कायदा दुरुस्ती अधिसूचना जारी झाली, त्याच दिवशी या १७ खाणींचे लिज नूतनीकरण झाल्याने आक्षेप घेण्यात आलेला आहे.
फाउंडेशनच्या आक्षेपावर हरकती आणि सूचना नोंदविण्याचे निर्देश खाण खात्याला देण्यात आलेले आहेत. सरकारने एकूण ८९ खाणींच्या लिजांचे नूतनीकरण केले आहे. बेकायदा खाणींबाबत न्यायमूर्ती शहा आयोगाने अहवालात ज्या काही त्रुटी दाखवून दिलेल्या आहेत, त्याबाबत कसून तपासणी केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Page 1: 14 Checking of mines within a week - Complete 30 inspection checks from State Pollution Control Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.