पेस स्पर्धेबाहेर
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
दुहेरीत बोपन्ना
पेस स्पर्धेबाहेर
दुहेरीत बोपन्ना क्वार्टर फायनलमध्येपेस स्पर्धेबाहेरलंडन : रोहन बोपन्ना याने विपरीत परिस्थितीत विजय मिळवीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. पण लियांडर पेस हा पाच सेट्समधील संघर्षात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. बोपन्नाने रोमानियाचा फ्लोरिन मर्जियाच्या सोबतीने पोलंडचा लुकास कुबोट व बेलारुसचा मॅक्स मिर्नयी यांचा ३ तास १९ मिनिटांत ७-६, ६-७, ७-६, ७-६ ने पराभव केला. लियांडर पेस आणि कॅनडाचा डॅनियल नेस्टर या जोडीला तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाचा अलेक्झांडर पेया व ब्राझीलचा बूनो सोरेस यांच्याकडून ३-६, ५-७, ६-३, ६-२, २-६ ने पराभवाचा धक्का बसला. मिश्र दुहेरीत मात्र पेसने हिंगीसच्या सोबतीने दुसरी फेरी गाठली. मुलांच्या एकेरीत भारताचा सुमत नागल अर्जेंटिनाच्या खेळाडूकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाला.(वृत्तसंस्था)