शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 9:01 PM

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते.

नवी दिल्ली- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील अनेकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डॉ. अभय बंग, राणी बंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर संपत रामटेके यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.  मध्य प्रदेशमधील भज्जू श्याम, केरळच्या लक्ष्मी कुट्टी, पश्चिम बंगालच्या सुधांशू बिस्वास, केरळच्या एमआर राजगोपाल, क्रीडाजगतात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर यांनाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारानं 85 पुरस्कार जाहीर केले असून, त्यात 73 पद्मश्री, 3 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश आहे.कर्नाटकातल्या सुलागट्टी नरसम्मा, महाराष्ट्रातल्या विजयलक्ष्मी नवनीतकृष्णन, पश्चिम बंगालमधल्या सुभासिनी मिस्त्री, तामिळनाडूमधले राजगोपालन वासुदेवन यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या वर्षात 89 लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 4417 जणांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे. कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो. 

पद्मश्रीने भावी कार्यासाठी बळ मिळेल - डॉ. अभय बंगगडचिरोली- गेल्या 40 वर्षात आम्ही सरकारवर कधी टीका केली तर कधी सहकार्य केले. या पुरस्काराने मात्र आमच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे. आम्हाला भावी समाजोपयोगी कार्यासाठी यातून शक्ती मिळेल, अशी प्रतिक्रिया पद्मश्रीचे मानकरी डॉ. अभय बंग यांनी लोकमतशी बोलताना दिली.वर्धेतील ज्येष्ठ गांधीवादी ठाकूरदास बंग यांचे सुपुत्र आणि स्नुषा असलेले डॉ. अभय व डॉ.राणी बंग यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वाधिक समस्याग्रस्त जिल्ह्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. यातूनच 1986 साली गडचिरोली गाठून सर्च या संस्थेची स्थापना केली. न्युमोनिया आणि कुपोषनामुळे होणारे  बालमृत्यू, माता म्रुत्यू टाळण्यासाठी उपचार करण्यासोबतच त्यांनी देशभरात या समस्येवर वेळोवेळी उपाय सुचवून सरकारचे ग्रामीण आरोग्याकडे लक्ष वेधले. यासोबतच अलीकडे गडचिरोली जिल्ह्यात तम्बाकू आणि दारुमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. वर्धेतील गांधी-विनोबांच्या आश्रमात बालपण गेल्यामुळे आपल्यावर सामाजिक कार्याचे संस्कार झाल्याचे डॉ. बंग सांगतात.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेतेअभय बंग- वैद्यकीय क्षेत्रराणी बंग- वैद्यकीय क्षेत्रअरविंद गुप्ता- साहित्य आणि शिक्षणमनोज जोशी- कला आणि अभिनयरामेश्वरलाल काबरा- व्यापार आणि उद्योगशिशिर पुरुषोत्तम मिश्रा- कला आणि सिनेमामुरलीकांत पेटकर- क्रीडा- जलतरणसंपत रामटेके(मरणोत्तर)- सामाजिक कार्यगंगाधर पानतवणे- साहित्य आणि शिक्षणपद्मविभूषण पुरस्कार विजेतेइलयाराजा- कला आणि संगीतगुलाम मुस्तफा खान- कला आणि संगीतपरमेश्वरन परमेश्वरन- साहित्य आणि शिक्षण

पद्मभूषण पुरस्कार विजेतेपंकज अडवाणी- क्रीडा/बिलियर्ड्स-स्नूकरफिलिपोस मार क्रिसोसटोम- आध्यात्मिकमहेंद्र सिंग धोनी- क्रीडाअलेक्झांडर कडाकिन(विदेशी / मरणोत्तर)- सार्वजनिक क्षेत्ररामचंद्रन नागास्वामी- पुरातत्त्व क्षेत्रवेद प्रकाश नंदा-  साहित्य आणि शिक्षणलक्ष्मण पई- कला-चित्रअरविंद पारीख- कला आणि संगीतशारदा सिन्हा- कला आणि संगीत