पचौरींच्या अटकेला गुरुवारपर्यंत स्थगिती
By Admin | Updated: February 23, 2015 23:05 IST2015-02-23T23:05:52+5:302015-02-23T23:05:52+5:30
लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करत असलेले दी एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे(टेरी) संचालक आऱ के़ पचौरी यांना सोमवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने अंतरिम दिलासा देत
पचौरींच्या अटकेला गुरुवारपर्यंत स्थगिती
नवी दिल्ली : लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करत असलेले दी एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे(टेरी) संचालक आऱ के़ पचौरी यांना सोमवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने अंतरिम दिलासा देत, त्यांच्या अटकेला २६ फेबु्रवारीपर्यंत स्थगिती दिली़
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पचौरींनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली़ कनिष्ठ न्यायालयाने पचौरींच्या अग्रिम जामीन अर्जावरील सुनावणीनंतर तपास अधिकाऱ्यास नोटीस जारी केली. पचौरींच्या आजारपणावर अहवाल द्या तसेच आजाराबाबतच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे आदेश न्यायालयाने तपास अधिकाऱ्यास दिले़
(लोकमत न्यूज नेटवर्क)