शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

पान १/ रेल्वे अपघातात ११ ठार

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

रेल्वेवर दरड कोसळून

रेल्वेवर दरड कोसळून
११ प्रवासी ठार, १६ जखमी
कर्नाटकातील दुर्घटना: दगडावर आदळून एक्स्प्रेस घसरली
अनेकल(कर्नाटक)- कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर- एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात ९ प्रवासी ठार तर १६ जखमी झाले.
सकाळी ७.३० वाजता बेंगळुरूपासून ४५ किमी अंतरावरील अनेकल आणि होसुल दरम्यान रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. बंगलोर-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बेंगळुरूवरून रवाना झाली होती.
घटनास्थळी हजर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांना या अपघाताची माहिती देताना सांगितले की, मदत कार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला होता. मृतांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि नऊ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेनंतर लगेच केलेल्या टिष्ट्वटमध्ये रुळावर एक मोठा दगड पडला होता. इंटरसिटी एक्स्प्रेस त्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे.
आपण एका मोठ्या दगडाचा आवाज ऐकल्याचे गाडीचालकाने अधिकार्‍यांना सांगितले होते. परंतु असा कुठलाही दगड मिळालेला नाही,असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अपघातात जखमी १६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक लालरोखुमा पचाऊ यांनी दिली. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.
रेल्वे, पोलीस, अग्निशामक विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे संयुक्तपणे बचाव कार्य सुरूअसून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्रीय विधी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा तातडीने अपघातस्थळी पोहचले होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांच्या सांगण्यानुसार या अपघातात ५० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती त्यांना प्रशासनाकडून मिळाली आहे. (वृत्तसंस्था)


रेल्वेमंत्री अपघातस्थळी,चौकशीचे आदेश
दरम्यान अपघातस्थळी पोहोचलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याचे तसेच भविष्यात अशाप्रकारच्या अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५०,००० रुपये तर किरकोळ जखमींना २०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांचा दुखवटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. (वृत्तसंस्था)