शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पी. ए. संगमा यांचे निधन

By admin | Updated: March 5, 2016 04:18 IST

लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे शुक्रवारी सकाळी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६८वर्षीय संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले होते.

नवी दिल्ली : लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे शुक्रवारी  सकाळी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६८वर्षीय संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले होते. ईशान्येकडील राज्यांमधून लोकसभाध्यक्षपदाचा मान मिळविणारे ते पहिले नेते होते. संगमा यांच्या मागे पत्नी सरोदिनी, मेघालयचे माजी अर्थमंत्री कॉनराड, आमदार जेम्स ही मुले आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सर्वांत तरुण मंत्री राहिलेल्या कन्या अगाथा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच लोकसभा व राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

पी. ए. संगमा यांचा जन्म १ सप्टेंबर १९४७ रोजी मेघालयातील प.घारो पर्वतीय जिल्ह्णातील चहापाटी या गावी झाला. ते छोट्याशा गावी वाढले. सेंट अ‍ॅन्थनी महाविद्यालयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी आसाममधील दिब्रुगड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर शिक्षण घेतले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे धडाडीचे नेते अशी ओळख निर्माण केली. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनल्यानंतर नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते कामगारमंत्री बनले होते.ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडत ममता बॅनर्जी यांच्यासोबत नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. संगमा यांनी ईशान्येचा विकास घडवून आणण्यासाठी दिलेले योगदान संस्मरणीय राहील. ते स्वयंभू नेते होते, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली. ते प्रभावी आणि यशस्वी लोकसभाध्यक्ष होते. ते सक्रिय होते आणि त्यांची प्रकृतीही उत्तम असल्यामुळे निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. -शरद पवार, संगमा हे देश आणि संसदेसाठी स्मरणात राहतील. आपण संसदेतील एक आदर्श सभापती गमावला आहे. - नितीन गडकरी, संगमा यांनी लोकसभाध्यक्ष म्हणून त्यांनी उच्च दर्जा मिळविला होता. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. - वेंकय्या नायडूलोकशाहीवादी नेता हरपला -विजय दर्डालोकसभेचे माजी अध्यक्ष पूर्णो संगमा यांच्या निधनामुळे देश एका सभ्य पण तेवढ्याच कणखर लोकशाहीवादी नेत्याला मुकला आहे. त्यांच्यासारखा हसतमुखाने असहमती दर्शविणारा राजकीय नेता क्वचितच आढळतो, अशा शब्दांत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी संगमा यांना श्रद्धांजली वाहिली.ईशान्येकडील राजकारणी म्हणून संगमा यांच्याशी जे संबंध आले त्याचे स्मरण करताना दर्डा म्हणाले, ‘गारो हिल्समधून आलेल्या या नेत्याने उच्च शिखर गाठले, परंतु सर्वसामान्य लोकांशी नाळ कधीच तुटू दिली नाही. ते अतिशय बुद्धिमान आणि उपेक्षित लोकांप्रति संवेदनशील होते.