पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:12 IST2018-06-28T07:12:23+5:302018-06-28T07:12:26+5:30

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या मेहुणीचे जावई शिवमूर्ती यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

P. Chidambaram's relative murder | पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकाची हत्या

पी. चिदम्बरम यांच्या नातेवाइकाची हत्या

कोईम्बतुर : माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या मेहुणीचे जावई शिवमूर्ती यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवमूर्ती हे सोमवारी रात्री कार्यालयातून परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर, पोलिसांना वेल्लोरच्या रस्त्यावर शिवमूर्ती यांची कार आढळून आली. शिवमूर्ती आपल्या तिरूपूर येथील कार्यालयातून परतत असताना त्यांचे तीन जणांनी अपहरण केले. त्यांना कोइम्बतूरहून मेट्टापलयम येथे आणण्यात आले. तिथे त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर त्यांचा मृतदेह होसूर येथील नाल्यात फेकून देण्यात आला, असे तपासात दिसून आले आहे. शिवमूर्ती यांचा स्वेटरसारख्या वस्त्रांच्या निर्यातीचा व्यवसाय होता. हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

Web Title: P. Chidambaram's relative murder