शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:05 IST

२६/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता- चिदंबरम

नवी दिल्ली: अमेरिकेनं ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार केलं, तशीच कारवाई करुन भारतानं हाफिज सईदचा खात्मा करावा, अशा चर्चा देशात अनेकदा होतात. आता या विषयावर देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही भाष्य केलं आहे. हाफिज सईदच्याविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात कधीच नव्हती, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. भारत मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्यांचा खात्मा करु शकतो. अमेरिकेनं लादेनविरोधात जशी कारवाई केली. त्याच प्रकारची कारवाई करण्याची क्षमता भारतामध्येही आहे, असं विधान काही तासांपूर्वी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं होतं. यानंतर चिदंबरम यांनी हाफिजबद्दल विधान केलं. चिदंबरम यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. 'मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईद कराचीतल्या सुरक्षितस्थळी होता. आता तर तो दिवसाढवळ्या अगदी मोकाट फिरतो. अमेरिकेनं अबोटाबादमध्ये घुसून ओसामाला कंठस्नान घातलं होतं. मात्र आपल्याकडे तशी क्षमता नाही,' असं चिदंबरम म्हणाले. 'आपल्याकडे तेव्हादेखील (२००८ मध्ये) तशी क्षमता नव्हती आणि आपल्याकडे आज तशी क्षमता असेल, तर ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेल. आम्ही अमेरिकेसारखी कारवाई करायचा प्रयत्न केला असता, तर आम्हाला अपयश आलं असतं आणि त्याचा मोठा फटका बसला असता,' असं चिदंबरम यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही त्यानंतर कूटनिटीचा वापर करुन पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला. २६/११ सारखा दुसरा हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा संदेश आम्ही कूटनितीच्या माध्यमातून पाकिस्तानला दिला होता,' असं चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवानBJPभाजपाcongressकाँग्रेस