शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 20:01 IST

Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार कोरोना लसींच्या किमतीवरून नफेखोरी वाढवण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपी. चिदंबरम यांचे मोदी सरकारवर टीकास्त्रछोट्या राज्यांना मोठे नुकसान होतेयपीएम केअर फंडाच्या रकमेचे काय झाले?

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात गंभीर आणि भीतीदायक वातावरण बनत चालले आहे. तसेच कोरोना लसीकरणाचा तुटवडाही अनेक राज्यांमध्ये जाणवू लागला आहे. देशातील दोन कंपन्यांच्या लसीचे डोसचे उत्पादन देशवासीयांच्या क्षमतेपेक्षा अत्यल्प असल्याने परदेशातील लसींना परवागनी देण्यात आली आहे. या एकंदर घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार कोरोना लसींच्या किमतीवरून नफेखोरी वाढवण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. (p chidambaram criticised modi govt on corona vaccine price)

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोना लसींच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित केल्या जात नाहीयेत. तसेच राज्य सरकारलाही त्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, अशी टीका चिदंबरम यांनी केली. 

“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

राज्यांना मोठे नुकसान होतेय

एकीकडे राज्यांचे महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. तसेच त्यांना जीएसटीचा वाटा केंद्राकडून दिला जात नाहीये. मर्यादित संसाधने असणाऱ्या छोट्या राज्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. राज्यांची कर्जे वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना लसींचे डोस निश्चित किमतीत मिळत नाहीयेत, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे. 

अनिल अंबानींची 'ही' कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला

पीएम केअर फंडाच्या रकमेचे काय झाले?

पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान केअर फंडावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. पीएम केअर फंडात जमा झालेली कोट्यवधींच्या रकमेचे नेमके काय झाले, याची कुणालाही माहिती नाही, असे टोला चिदंबरम यांनी लगावला आहे. 

दरम्यान, आता १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरमprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण