शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:07 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत भाजपाकडून ना कुणी माफी मागितली ना कुणी राजीनामा दिला. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये प्रसाराचासाठी आलेल्या पी. चिदंबरम यांनी गुजरात सरकार दिल्लीहून चालवलं जात असल्याचा आरोप केला. 

गुजरातमध्ये एक आणि पाच डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. मोरबीत ब्रिटीश कालीन केबल पूल ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. एका खासगी कंपनीकडून या पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं गेलं होतं आणि चारच दिवसांनी ही दुर्घटना घडली होती. 

"मोरबी दुर्घटनेबाबत जितकं मला माहित आहे त्यानुसार आतापर्यंत या घटनेसाठी सरकारकडून ना कुणी माफी मागितली आणि ना कुणी राजीनामा दिला आहे. हिच घटना जर परदेशात घडली असती तर तातडीनं राजीनामे घेण्यात आले असते. आगामी निवडणूक सहजपणे जिंकू असं भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी या घटनेसाठी जनतेला उत्तर देणं त्यांना महत्वाचं वाटत नाही. गुजरातचं सरकार मुख्यमंत्री नव्हे, तर दिल्लीतून चालवलं जात आहे", असं पी. चिदंबरम म्हणाले. 

काँग्रेसला संधी देण्याचं केलं आवाहन"ज्या राज्यांमध्ये लोक सरकारला पराभूत करतात, त्यांना जबाबदारीची जाणीव असते वाटते. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की हे सरकार बदला आणि काँग्रेसला संधी द्या. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नोकर असल्याचसारख्या वागत आहेत. या संस्थांनी अटक केलेल्यांपैकी ९५ टक्के विरोधी पक्षांचे राजकारणी आहेत", असंही पी. चिदंबरम म्हणाले.  

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलcongressकाँग्रेस