‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 05:57 AM2022-09-14T05:57:17+5:302022-09-14T05:57:40+5:30

ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे.

'Oxygen' shortage, audit deaths; Recommendation of Parliamentary Standing Committee | ‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

Next

नवी दिल्ली : कोविड १९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंचे राज्यांसोबत समन्वयाने लेखा परीक्षण करण्यात यावे, अशी शिफारस एका आरोग्यविषयक संसदीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. लेखा परीक्षणामुळे कोविड मृत्यूूंचे योग्य दस्तऐवजीकरण होऊ शकेल, असे या समितीने म्हटले आहे. 

ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविड १९ मृत्यू प्रकरणांची बारकाईने छाननी करून मंत्रालयाने पीडित कुटुंबांना योग्य भरपाई दिली पाहिजे. संसदेच्या आरोग्यविषयक स्थायी समितीने सोमवारी राज्यसभेत आपला १३७ वा अहवाल सादर केला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवर  प्रचंड दबाव टाकला होता.

दुसऱ्या लाटेत दाव्यांचे पितळ उघडे पडले
रुग्णांच्या कुटुंबियांनी ऑक्सिजनसाठी रांगा लावल्याची अनेक उदाहरणे समोर आली होती.  समितीने आपल्या १२३व्या अहवालात रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवड्याबाबत सरकारला सावध केले होते. यावर आरोग्य मंत्रालयाने देश ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत स्वावलंबी असल्याचा दावा केला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत या दाव्यांचे पितळ उघडे पडले. 

काय म्हटले समितीने
सरकारला राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या वितरणाचेही योग्य व्यवस्थापन करता आले नाही.
ऑक्सिजनची वेगाने वाढलेली मागणी व पुरवठा यात सरकारला समतोल राखता आला नाही. 
ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या खाटांची उपलब्धता यांच्या सुुमार देखरेखीमुळे परिस्थिती गंभीर बनली.

Web Title: 'Oxygen' shortage, audit deaths; Recommendation of Parliamentary Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.