शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

डेंग्युवर मात करुन डॉ. मनमोहनसिंग घरी परतले, सर्वांचे आभार मानले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 4:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली होती. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता

ठळक मुद्दे रविवारी त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, आज सोमवारी त्यांना रुग्णलायातून डिस्चार्ज देण्यात आला. 

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना (Manmohan Singh) दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत होती. अखेर, डेंग्यू आजारावर मात करुन मनमोहनसिंग घरी परतले आहेत. सिंग याची प्रकृती आता उत्तम असून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली होती. मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून ते छातीत श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार करत होते. त्यांना ताप आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने त्यांना एम्सच्या केसी. एन टॉवरमध्ये भरती करण्यात आले. एम्स टीमचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात सिंग यांच्यावर उपचार करण्यात आले. रविवारी त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, आज सोमवारी त्यांना रुग्णलायातून डिस्चार्ज देण्यात आला.  AIIMS चे सर्व डॉक्टर, परिचारिका, सहाय्यक कर्मचारी यांचे आणि मनमोहन सिंग यांच्यासाठी प्रार्थना करण्याऱ्या सर्व हितचिंतकांचे आम्ही आभार मानतो, असे डॉ मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी म्हटले आहे.

मोदींनीही केली होती प्रार्थना

मनमोहनसिंग यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन, डॉ. सिंग यांची तब्येत लवकरच ठणठणीत होवो, ही प्रार्थना केली होती. तर, माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्विट करुन मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना केली होती. 

दरम्यान, मनमोहन सिंग यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना सोडण्यात आले होते. आता, पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता, त्यात डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सिंग यांनी डेंग्युवर मात केली, त्यामुळे रुगणालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगhospitalहॉस्पिटलNew Delhiनवी दिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालय