शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Lok Sabha Election 2019: भाजपाविरोधात सिने कलाकारांचा एल्गार; मत न देण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 09:55 IST

देशभरातले 100 हून अधिक कलाकार, फिल्ममेकर्स भाजपाविरोधात एकवटले

मुंबई: देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन  केलंय. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलंय. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास 111 लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणं आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या पत्रकात भाजपा सरकारकडून सैन्यदलाच्या शौर्याचा केला जात असलेला गैरवापर यावर चिंता व्यक्त करण्यात आलीय. देशात उगाच युद्धाचं वातावरण तयार करणं, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संस्था नेस्तनाबूत करणे, देशात विज्ञानविरोधी वातावरण तयार करणे, ज्या व्यक्तींचा कला, संस्कृती आणि विज्ञानाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना महत्त्वाच्या पदावर बसवणे आणि देशाचं हसू करुन घेणं.कलात्मकतेवर खासकरुन सिनेमा आणि पुस्तकांवर बंदी किंवा सेन्सॉरशीप आणणं, जेणेकरुन लोकांना चांगल्या विचारांपासून परावृत्त करणे हे सर्व भाजपाचं सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक होतंय असं या पत्रकात म्हटलं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे, असं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. याविरोधात आता आवाज उठवला नाही तर देश असंभवाच्या गर्तेत लोटला जाईल आणि होणारं नुकसान पिढ्यानपिढ्या भरु शकणार नाही असं आर्टिस्ट युनाएटेड इंडियाचं म्हणणं आहे. या 111 लोकांच्या यादीवर नीट नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की हे सर्व फिल्म मेकर्स कधी ना कधी सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलेत. गेली पाच वर्षे अभिव्यक्तीच्या दृष्टीनं अत्यंत वाईट गेली. आता तरी अच्छे दिन यावेत यासाठी भाजपाला नकार द्या असं या कलाकारांना वाटतंय. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाbollywoodबॉलिवूड