शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

योगी सरकार बरखास्त करा, हाथरस घटनेविरोधात देशभरात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:42 IST

राहुल, प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यास निघाल्यावर यमुना एक्स्प्रेस-वे वर रोखले

नॉयडा : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाललेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवर अडवून ताब्यात घेतले व काही वेळानंतर त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून दिले. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना ढकलून देण्यात आले.

ताफा अडवल्यानंतर हाथरसकडे पायी निघालेले काँग्रेस कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापटही झाली. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेसने निदर्शने केली आहे. योगी सरकार भरखास्त करा, आता भाजप गप्प का? असा सवालही महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. हाथरसला निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई, महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, चेन्नई यासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली.राहुल गांधी पोलिसांना चुकवून हाथरसला जाण्याची योजना आखत असल्याचेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.यूपी पोलिसांनी थांबवला काँग्रेसचा ताफा, कारण..जमावबंदी, लॉकडाऊनबलात्कार पीडित दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल व प्रियांका गांधी गुरुवारी सकाळी दिल्लीहून हाथरसला जायला निघाले. त्यावेळी त्यांच्यासोबत हजारो काँग्रेस कार्यकर्ते होते.त्यांचा ताफा यमुना एक्स्प्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी अडविला. ते पाहून काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले.हाथरसमध्ये जमावबंदी आदेश (कलम १४४) लागू असल्याने तिथे इतक्या लोकांना जाता येणार नाही असे पोलिसांनी सांगताच मला एकट्याने तिथे जाऊ द्या असा राहुल गांधी यांनी धरलेला आग्रही मान्य करण्यात आला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी केलेल्या लाठीमाराचे राहुल गांधींनाही तडाखे बसले व ते खाली पडले. त्यांना जखम झाली असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. प्रियांका व राहुल गांधी यांना ताब्यात घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवरील एका गेस्ट हाऊसमध्ये नेले. तिथून त्यांना पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आले.आमच्या गाड्या अडवण्यात आल्या. आम्ही पायी चालायला सुरूवात केली तर तेथेही पोलिसांनी अडवले. केवळ मोदीजी रस्त्यांने पायी जाऊ शकतात का? सामान्य व्यक्ती चालू शकत नाही का?- राहुल गांधीयोगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का? राज्यभर काँग्रेसची निदर्शनेउत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसादराज्यात ठिकठिकाणी उमटले. प्रदेश काँग्रेसने मुंबईत निदर्शने करून योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. छोट्या छोट्या गोष्टीत सतत टिवटिव करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उत्तर प्रदेशच्या याघटनेवर मौन का बाळगले आहे? महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना ही दुर्दैवी घटना मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध का केला नाही? अस सवालही काँग्रेस नेत्यांनी केला. - वृत्त/राज्यउत्तर प्रदेशमध्ये जे घडले, महिलांवर अत्याचार, हे नाही सहन होणार. महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये की माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचे तर सोडाच पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीएम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होताहाथरस येथील बलात्कार पीडित दलित मुलीला उपचारांसाठी आम्ही दिल्लीतील एम्समध्ये हलविण्याचा सल्ला दिला होता. तिला सफदरजंग रुग्णालयात कसे दाखल करण्यात आले हे माहित नाही असे अलिगढ येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शाहिद अली यांनी म्हटले आहे. अलिगढमधील या रुग्णालयात दलित मुलीवर दोन आठवडे उपचार सुरू होते. त्यानंतर तिला दिल्लीच्या रुग्णालयात हलविण्यात आले.अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून घेतली दखलहाथरस प्रकरणाची अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून दखल घेतली असून, याबाबत १२ आॅक्टोबरपर्यत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश राज्यातील गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि हाथरसच्या पोलिसांना दिले आहेत.बलात्कार झाला नाही शवचिकित्सा निष्कर्षउत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या शवचिकित्सेतून आढळून आले आहे. ही माहिती त्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या दलित मुलीचा मृत्यू गळ््याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमुद करण्यात आले आहे. तिच्या शवचिकित्सेमध्ये वीयार्चे अंश आढळून आले नाहीत.शवविच्छेदन अहवालात काय ?बलात्काराचा उल्लेख नाहीपीडितेच्या मणक्याला दुखापततरुणीच्या मानेलाही दुखापतपीडितेला हार्ट अटॅक आला होताब्लड इन्फेक्शन झाले होते२९ सप्टेंबर सकाळी ६ वाजून५५ मिनिटांनी मृत्यू

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशRapeबलात्कार