शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या भावना दडपल्यास उद्रेक होईल - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 07:28 IST

पुणे पोलिसांना फटकारले : विरोधी मत मांडू देणे आवश्यक तसेच कोरेगांव-भीमा प्रकरणी पकडलेल्या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली/पुणे : लोकशाहीमध्ये वेगळे वा विरोधी मत मांडू देणे आवश्यकच असते. त्यामुळे लोकांच्या मनातील भावनांना वाचा मिळते. ते दडपण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेकच होऊ शकतो, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले. पाचही माओवादी समर्थकांना केवळ नजरकैदेत ठेवण्याचा आदेश पुणे पोलिसांना दिला. त्यापैकी तिघे अटकेत असून, दोघे नजरकैदेतच आहेत. न्यायालयाचा हा आदेश म्हणजे पुणे पोलिसांना जणू तंबी असल्याचेच मानले जाते.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अटक झालेल्या तिघांची सुटका करण्याचे आदेश पुणे न्यायालयानेही दिले. त्यांना आज विश्रामगृहात ठेवण्यात येणार असून, गुरुवारी त्यांना घरी पाठविले जाईल. मात्र तिथे ते ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत असतील. त्यांच्या अटकेच्या विरोधातील याचिकेची पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी छापे घालून पाच माओवादीसमर्थर्काना अटक केली होती. त्यापैकी गौतम नवलखा यांना दिल्लीबाहेर नेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने ते घरीच नजरकैदेत होते, तर श्रीमती सुधा भारद्वाज यांनाही नजरकैदेतच ठेवले होते. भीमा कोरेगांव हिंसक दंगलीप्रकरणी डाव्या विचारांच्या या पाच जणांना झालेली अटक व महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, दिल्ली व झारखंडात झालेली छापेमारी याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या अटकेची दखल घेत, राज्य सरकारला जाब विचारला. अटकेविरोधात स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.हाती ठोस पुरावेगृह मंत्रालयाच्या सूत्रांनी असा दावा केला की महाराष्ट्र पोलिसांकडे पाचही आरोपींविरूध्द पुरेसे पुरावे आहेत. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, हाती सबळ पुरावे आल्यानंतरच डाव्या विचारकांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार