बालसुधारगृहातून सुटला आणि पुन्हा बलात्कार केला

By Admin | Updated: February 3, 2016 11:58 IST2016-02-03T11:58:27+5:302016-02-03T11:58:57+5:30

एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन वर्ष सुधारगृहात धाडण्यात आलेल्या आरोपीने बाहेर येताच पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

Out of the juvenile home and raped again | बालसुधारगृहातून सुटला आणि पुन्हा बलात्कार केला

बालसुधारगृहातून सुटला आणि पुन्हा बलात्कार केला

>ऑनलाइन लोकमत
कृष्णागिरी (तामिळनाडू), दि. ३ - एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर शिक्षा म्हणून दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात धाडण्यात आलेल्या आरोपीने बाहेर येताच पुन्हा एका मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. किशोर असे त्याचे नाव असून तामिळनाडू पोलिसांनी कृष्णगिरी जिल्ह्यातील सुलागिरी येथून मंगळवारी रात्री त्याला अटक केली. 
किशोर चौदा वर्षांचा असताना त्याने एका २४ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता, मात्र त्यावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याला शिक्षा म्हणून दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले. अवघ्या काही दिवसांपूर्वीच तो बालसुधारगृहातून सुटला पण त्याने एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी घराजवळ खेळत असतानाच आरोपी तिला जबरदस्तीने एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. बचावासाठी त्या मुलीने आरडा-ओरड केली असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, मात्र तिचा आवाज ऐकून गावातील इतर नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे संतापलेल्या तिच्या पित्याने सूलागिरी पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी आरोपीला मंगळवारी पुन्हा अटक केली. 

Web Title: Out of the juvenile home and raped again