मानवी वस्तीतुन बाहेर मर्कटाचा आटापिटा
By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST
मानवी वस्तीतुन बाहेर मर्कटाचा आटापिटा
मानवी वस्तीतुन बाहेर मर्कटाचा आटापिटा
मानवी वस्तीतुन बाहेर मर्कटाचा आटापिटामुंबई : मागील आठवड्याभरापासून मालवणीत भरकटलेल्या आजारी मर्कटाचा मानवी वस्तीतून बाहेर पडण्यासाठी आटापिटा सुरु आहे. मात्र त्याला या वस्तीमधून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसल्याने स्थानिकांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. हे आजारी मर्कट येथील फळभाज्यांच्या गाड्यांवर आपली तहानभूक भागवत असून, त्याचे आजारपण वाढत असल्याने त्याच्या हालचाली कमी झाल्या आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन विभागाने आजारी मर्कटावर वेळीच उपचार करून त्याला ताब्यात घ्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.