Out of 291 candidates of Trinamool Congress, 50 are women | तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांमध्ये ५० महिला

तृणमूल काँग्रेसच्या २९१ उमेदवारांमध्ये ५० महिला

 

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या २९१ उमेदवारांची नावे शुक्रवारी जाहीर केली असून, त्या स्वत: आपल्या नेहमीच्या मतदारसंघाबरोबरच तृणमूलमधून  भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू सरकार यांच्याविरोधात नंदीग्राममधून निवडणूक लढवणार  आहेत.
तृणमूलने तीन जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या आहेत. तृणमूलच्या २९१ जणांच्या यादीत ५० महिला आहेत. याशिवाय पक्षाने ४२ मुस्लिम, ८९ दलित व १७ आदिवासींना उमेदवारी देण्यात आली आहे. काही आमदारांचे वय अधिक असल्याने, तर काही आजारी असल्याने त्या जागी नवे उमेदवार देण्यात आल्याचे  ममता बॅनर्जी यांनी सांगितले. निवडणुका खेळू, लढू व जिंकू, अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली.

तामिळनाडूत चित्र अस्पष्ट
तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक व भाजप यांच्यातील जागा वाटप पूर्ण झालेले नाही. तेथील चित्र त्यामुळे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र अण्णा द्रमुकने सहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यात मुख्यमंत्री ई पलानीसामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश आहे.
आसाम भाजपचे ७० उमेदवार
आसाममध्ये भाजपने ७० उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व हिमंत बिस्वा सर्मा या दोघा नेत्यांची नावे आहेत. तिथे १२६ पैकी भाजप ९२ जागी उमेदवार उभे करणार असून, आसाम गण परिषदेला २६ व युनायटेड पीपल्स पार्टी (लिबरल) ला ८ जागा सोडण्यात आल्या आहेत. 
राज्यात काँग्रेस ९२ जागी लढणार असून, डावे पक्ष १६६ जागी उमेदवार उभे करणार आहेत. या आघाडीतील इंडियन सेक्युलर फ्रंटला ३८ जागा देण्यात आल्या आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Out of 291 candidates of Trinamool Congress, 50 are women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.