शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

आमचे ‘भ्रष्टाचार हटाओ’, विरोधकांचे ‘मोदी हटाओ’, प्रचारसभेत नरेंद्र मोदींचा ‘इंडिया’वर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 09:13 IST

Lok Sabha Election 2024: “नेहमी एकमेकांशी भांडणारे देशातील सर्व भ्रष्ट लोक आज मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. मी म्हणतो भ्रष्टाचार हटवा, ते म्हणतात भ्रष्टाचारी वाचवा, मोदी हटवा,” अशी टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बिहारमधील जमुई येथून लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले.

- एस. पी. सिन्हा जमुई - “नेहमी एकमेकांशी भांडणारे देशातील सर्व भ्रष्ट लोक आज मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. मी म्हणतो भ्रष्टाचार हटवा, ते म्हणतात भ्रष्टाचारी वाचवा, मोदी हटवा,” अशी टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जमुई येथून लोकसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले.

पंतप्रधान मोदी यांनी स्थानिक भाषेत सभेला सुरुवात केली. यानंतर जनतेने एका आवाजात ‘विजयी सभा’ असा हुंकार भरला. “आज जमुईच्या या सुंदर भूमीवर जमलेली ही गर्दी सांगतेय की, लोकांचा मूड काय आहे? जमुईमधून भाजप आणि एनडीएच्या बाजूने उठलेला हा आवाज संपूर्ण देशात गुंजत आहे,” असे मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी भाषणात लालू कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला. रेल्वेत भरतीच्या नावाखाली गरीब तरुणांकडून जमिनी नावावर करून घेणारे राज्यातील तरुणांचे कधीही भले करू शकत नाहीत. एनडीएचे सरकार सौरऊर्जा आणि एलईडी दिव्यांबद्दल बोलते, दुसरीकडे अहंकारी आघाडीच्या लोकांना बिहारला कंदील युगात ठेवायचे आहे, असा हल्लाही त्यांनी केला.

आजचा भारत घराघरांत घुसून मारतोआजचा भारत घराघरांत घुसून मारतो. आजचा भारत जगाला दिशा दाखवतो. अवघ्या १० वर्षांत भारताची प्रतिष्ठा कशी वाढली, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे. नक्षलवाद संपला. जे नक्षलवादाच्या मार्गाने भरकटले आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणले आहे, असे मोदी म्हणाले.

आता इकडे-तिकडे जाणार नाही : नितीशप्रचारसभेला पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही होते. त्यांनी आता इकडे-तिकडे जाणार नसल्याचा पुनरुच्चार करीत एनडीए सोबतच राहणार असल्याची ग्वाही दिली. पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षांत खूप काम केले, अशी प्रशंसाही त्यांनी केली.

भारताच्या भविष्यासाठी निर्णायक निवडणूकबिहारच्या भूमीने स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका बजावली आहे. मात्र, बिहारच्या क्षमतेला न्याय मिळाला नाही. एनडीए आघाडीने मोठ्या कष्टाने बिहारला एका मोठ्या दलदलीतून बाहेर काढले आहे. नितीशकुमारांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा