शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:55 IST

Water Filled instead of Fuel Innova: अक्षरश: पेट्रोल पंपावरच गॅरेज सुरु झाले. मेकॅनिकला बोलविण्यात आले. दुचाकींच्या टाक्या खोलून त्यातील इंधन काढले गेले तर त्यात पाणी सापडले. अनेकांच्या बाबतीत हे झाल्याने प्रशासनाने अखेर तो पेट्रोल पंपच सील केला आहे.

पावसाचे दिवस आणि त्यात इथेनॉल मिश्रीत इंधन यामुळे अनेकांच्या गाड्यांच्या इंधनाच्या टाकीत पाणी तयार होत आहे. या पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी टाक्यांमध्ये या थेंबापासून इथेनॉलबरोबर प्रक्रिया होऊन ते पाणी तयार करत आहे. अशातच पेट्रोल पंपांच्या टाकीत देखील पाणी होत आहे आणि ते ग्राहकांच्या वाहनांत जाऊन वाहने बंद पडत आहेत. असाच प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यासाठी इंदूरहून रतलामला १९ इनोव्हा कार मागविण्यात आल्या होत्या. शुक्रवारी रतलाममध्ये रीजनल कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले आहे. याला यादव यायचे होते. म्हणून गुरुवारी रात्री या १९ इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलिअमच्या पेट्रोल  पंपावर पाठविण्यात आल्या. डिझेल भरून या कार परत येत होत्या. इतक्यात एकेक करून कार बंद पडायला लागली. यामुळे धावपळ उडाली. चालकांच्या इंधनात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रशासनाला कळविल्यावर गोंधळ उडाला. या कार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणार होत्या. पण त्या आदल्या रात्रीच सगळ्या बंद पडल्या. 

यामुळे सरकारी अधिकारी, पोलीस या पेट्रोल पंपावर आले, काही ड्रायव्हर देखील या ठिकाणी आले. या काळात जे लोक या पंपावरून इंधून भरून गेले होते ते देखील तक्रार घेऊन यायला लागले. या लोकांच्या इंधन टाकीत पेट्रोल, डिझेल ऐवजी पाणी सापडले. अक्षरश: पेट्रोल पंपावरच गॅरेज सुरु झाले. मेकॅनिकला बोलविण्यात आले. दुचाकींच्या टाक्या खोलून त्यातील इंधन काढले गेले तर त्यात पाणी सापडले. अनेकांच्या बाबतीत हे झाल्याने प्रशासनाने अखेर तो पेट्रोल पंपच सील केला आहे. 

आता या वाहन चालकांना त्यांचे इंजिन साफ करून घ्यावे लागणार आहे. याचा खर्च आता पेट्रोल पंपचालक देतो की वाहनचालकांनाच नाहक भुर्दंड पडतो, हे पहावे लागणार आहे. प्रशासनाने रातोरात पुन्हा इंदूरहून कार मागविल्या आहेत. या १९ इनोव्हा कारमध्ये प्रत्येकी 20 लीटर डिझेल भरण्यात आले होते. त्यात १० लीटर पाणीच सापडले आहे. एका ट्रक चालकानेही या पंपावर २०० लीटर डिझेल भरले होते, तो देखील काही अंतरावर जाऊन बंद पडला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीDieselडिझेलPetrol Pumpपेट्रोल पंप