शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशक कर्मचार्‍यांनी पूर्णवेळ काम करण्याचे आदेश

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

पुणे : महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांच्या कामाची वेळ सकाळी ७. ३० ते दुपारी ३. ३० अशी ८ तासांची करावी असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पूर्वी किटकनाशकच्या कर्मचार्‍यांना ६ तासांची डयुटी देण्यात आली होती, अत्यावश्यक सेवेमध्ये किटक प्रतिबंधक विभागाचा समावेश होत असल्याने त्यांच्या कामाची वेळ ८ तासांची करण्यात आली आहे.

पुणे : महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांच्या कामाची वेळ सकाळी ७. ३० ते दुपारी ३. ३० अशी ८ तासांची करावी असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पूर्वी किटकनाशकच्या कर्मचार्‍यांना ६ तासांची डयुटी देण्यात आली होती, अत्यावश्यक सेवेमध्ये किटक प्रतिबंधक विभागाचा समावेश होत असल्याने त्यांच्या कामाची वेळ ८ तासांची करण्यात आली आहे.
शहरामध्ये डासअळीनाशक, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून किटकनाशक औषधांची फवारणी केली जाते. या कामाकरिता आरोग्य विभागाकडून ३५० कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहराच्या लोकसंख्येने ३५ लाखांचा टप्पा ओलांडला असताना शहराच्या आरोग्याचा भार याच कर्मचार्‍यांवर आहे. त्यांची कामाची वेळ पूर्वी सकाळी साडे सात ते दुपारी दीड अशी आहे.
शहरामधील नदीकिनारे, खडड्े, बांधकामाचे डक्ट, नाले, गटारी याठिकाणी महापालिकेकडून नियमित किटकनाशक व औषध फवारणी केली जाते. मध्यंतरीच शहरात डेंग्यूचा मोठा फैलाव झाला होता. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा साथी अत्यंत वेगाने पसरतात. चुकून रोगाची उत्पत्ती झाल्यास त्याला अटकाव करणे खूप अवघड जाते. त्यामुळे औषध फवारणीची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने किटक नाशक विभागातील कर्मचार्‍यांच्या कामाची वेळ ६ तासावरून ८ तास करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या कर्मचार्‍यांना ६ तासांची डयुटी का देण्यात आली याची कोणतीही माहिती प्रशासनाच्या दफ्तरी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांच्या कामाची वेळ पूर्ववत ८ तास करण्यात यावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
किटकनाशक विभागातील कर्मचार्‍यांना अंघोळ केल्याशिवाय जेवण करता येत नाही, त्यामुळे त्यांना अंघोळीसाठी दीड तासाची सवलत देण्यात आली होती. नवीन बदलामुळे त्यांना या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. हा निर्णय चुकीचा असून तो बदलण्यात यावा अशी मागणी महानगरपालिका कामगार संघटनेचे सरचिटणीस एस. के. पळशे यांनी केली आहे.

चौकट
सुरक्षितेची साधने द्यावीत
किटकनशाक विभागातील कर्मचार्‍यांना प्रशासनाने सेफ्टी शुज, कपडे, हॅन्डगोलज, गॉगल आदी सुरक्षितेची साधने पुरविणे आवश्यक असताना ती देण्यात आलेली नाहीत त्यामुळे जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागत आहे. यापुढे प्रशासनाने ही सेफ्टी साधने पुरविल्याशिवाय कोणतेही काम करणार नाही असे महानगरपालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.