शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

विरोधकांची एकजूट फ्लॉप होण्याचे संकेत; पाटण्यात होणाऱ्या बैठकीला मोठे नेते उपस्थित राहणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 19:39 IST

बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन आणि सिताराम येचुरी हे दिग्गज नेते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली : येत्या 12 जून रोजी पाटणा येथे होणार्‍या विरोधी पक्षांच्या एकजुटीला धार देणार्‍या बैठकीला मोठा झटका बसला आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन आणि सिताराम येचुरी हे दिग्गज नेते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे 2024 पूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हादरवण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जींच्या सल्ल्यानुसार 12 जून रोजी पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अनेक बडे नेते अनुपस्थित राहणार आहेत. यादरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या जागी पक्षाच्या इतर कोणत्याही प्रतिनिधीचा समावेश केला जाईल. याशिवाय, एमके स्टॅलिन आणि सीताराम येचुरी यांनीही बैठकीला येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे, याचा अर्थ पाटण्यातील विरोधी एकजुटीचे फ्लॉप शोमध्ये रूपांतर होण्याचे सर्व संकेत मिळत आहेत. 

दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे 12 जून रोजी अनुपस्थित असल्यामुळे बैठकीची तारीख 23 जूनपर्यंत पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. मात्र, नितीश कुमार यांनी तारीख वाढवण्यास असमर्थता दर्शवली होती. दुसरीकडे एमके स्टॅलिन आणि सीपीएम नेते येचुरी हेही वेगवेगळ्या कारणांमुळे बैठकीला हजर नाहीत. सुत्रांच्या दाव्यानुसार, सिताराम येचुरी यांना काँग्रेससोबतच्या बैठकीला हजर राहायचे होते, पण राहुल गांधींच्या अनुपस्थितीमुळे ते जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अशा अनेक विरोधाभासांमध्ये विरोधकांच्या एकजुटीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्याच्या मोहिमेत गुंतले आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. तसेच, नितीश कुमार यांनी सर्व नेत्यांची भेट घेऊन या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र या बैठकीवर सावट दिसून येत आहे; यामध्ये कोण कोणत्या पक्षातून येणार? याबाबत अद्याप निश्चित झाले नाही. 

दुसरीकडे भाजपचे असे मत आहे की, इंदिरा गांधींचे सदस्यत्व 12 जून 1975 रोजी रद्द करण्यात आले होते, त्यामुळे काँग्रेस हा दिवस अशुभ दिवस मानते. अशा स्थितीत सभेची तारीख बदलावी, अशी काँग्रेसच्या लोकांना आधी इच्छा होती. मात्र नितीश कुमार यांना ते मान्य नव्हते. तसेच, आता नितीश कुमार यांनी मुद्दाम हा दिवस निवडला का? असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस