शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 22:14 IST

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

नवी दिल्ली: येत्या 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदानानंतर, त्याच दिवशी राजधानी दिल्लीत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विरोधी नेते निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतील आणि त्याचे मूल्यांकन करतील. तसेच 4 जून रोजी येणारे निकाल लक्षात घेऊन भविष्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा होईल.

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार, विरोधकांचा दावाइंडिया आघाडीतील प्रमुख नेते या बैठकीला हसभागी होणार आहेत, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. शिवाय, भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळणार असल्याचेही अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे. तर, इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा दावा विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे भविष्यातील रणनीतीवर विचार करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. 

तृणमूल काँग्रेस सहभागी होणार नाहीकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने मित्रपक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी संदेश पाठवण्यात आला आहे. दरम्यान, 1 जून रोजी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक असल्यामुळे ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस या बैठकीत सहभागी होणार नाही. तिथे सातव्या आणि अंतिम टप्प्यात लोकसभेच्या नऊ जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या कोलकातामधील दोन जागांचाही समावेश आहे. 

बैठकीला हे नेते उपस्थित राहणार तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीसोबत जागांचा करार केला नाही, परंतु ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्या इंडिया आघाडीचा एक भाग आहेत आणि विरोधी पक्षाचे सरकार स्थापन झाले, तर तृणमूल काँग्रेस त्याचा एक भाग असेल. दिल्लीत होणाऱ्या बैठकीला शरद पवार, सीताराम येचुरी, डी राजा यांच्यापासून ते द्रमुक, झामुमो, नॅशनल कॉन्फरन्स, आरजेडी, सपा आणि विरोधी आघाडीत समाविष्ट असलेल्या इतर पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा