शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:00 IST

आज भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक पार पडली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

NDA Meeting: संसद भवनात आज(दि.५) राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA) ची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बैठकीत सन्मान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरवरुन विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 'ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला,' अशी बोचरी टीका पीएम मोदींनी केली.

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणाऑपरेशन सिंदूरवरुन संसदेत बराच गदारोळ झाला. विरोधकांकडून सरकारवर अनेक आरोप करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी  बैठकीत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी चूक केली, स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. यामुळे आता त्यांना लाजीरवाणे वाटतेय. विरोधकांनी दररोज अशा चर्चा कराव्यात. हे आमचे मैदान आहे. या मैदानात साक्षात देव माझ्यासोबत आहे,' असेही मोदी यावेळी म्हणाले. 

गृहमंत्री अमित शाहांचे कौतुक यावेळी पीएम मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'लालकृष्ण अडवाणीनंतर अमित शाह हे सर्वात जास्त काळ गृहमंत्री राहिले आहेत. ही फक्त सुरुवात आहे.' एनडीएच्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी खासदारांना आगामी कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होण्यास सांगितले. यासोबतच त्यांनी संबंधित संसदीय मतदारसंघात तिरंगा यात्रा आणि क्रीडा दिनासारखे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला.

बैठकीत दोन ठराव मंजूरएनडीएच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात पंतप्रधान मोदी तसेच भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील प्रमुख एनडीए नेते बैठकीला उपस्थित होते. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा