भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:17 AM2017-11-20T04:17:17+5:302017-11-20T04:18:06+5:30

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी गांधीनगरमधील पक्षाच्या शाखा कार्यालयावर निदर्शने केली.

Opposition in the party, BJP's protesters protest | भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात तीव्र नाराजी

भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात तीव्र नाराजी

Next

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी गांधीनगरमधील पक्षाच्या शाखा कार्यालयावर निदर्शने केली. भाजपने आतापर्यंत १०६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिटे दिल्याबद्दल कार्यकर्त्यांना राग होता, तर काही कार्यकर्त्यांनी जाहीर झालेल्या नावांना न बदलल्यास पक्षाचा पराभव अटळ आहे, असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. माझ्या मुलाला उमेदवारी न दिल्यास मी राजीनामा देईन, अशी धमकी पाटण येथील भाजपच्या खासदाराने दिली.
नांदोद (अनुसूचित जमाती), निकोल, नरोदा, खेरालू आणि अंकलव येथील शेकडो कार्यकर्ते भाजपच्या मुख्यालयावर पोहोचले. नर्मदा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नांदोदचे (अनुसूचित जमाती) विद्यमान आमदार शब्दशरण तडवी यांना पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल विरोध केला. त्यांची लोकप्रियता लयाला जाऊन अनेक वर्षे झाली, असे नर्मदा जिल्हा भाजपचे चिटणीस करणसिंह परमार म्हणाले. (वृत्तसंस्था)

गेल्या पाच वर्षांत तडवी यांनी मतदारसंघात विकास केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. तडवीच उमेदवार राहणार असतील, तर भाजप नर्मदा जिल्ह्यातून यावेळी नाहीशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पराभव टाळण्यासाठी तडवींना सक्षम उमेदवाराचा पर्याय दिला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना वाटते.
>हिमाचल प्रदेशात ५० जागा मिळतील
सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या किमान ५० जागा आम्ही जिंकू, असा विश्वास राज्याच्या भाजपने रविवारी व्यक्त केला आहे. पक्षाच्या समितीची बैठक हमीरपूर येथे रविवारी झाली. मतदानानंतरच्या परिस्थितीचा आढावा तीत घेतला गेला. ६८ सदस्यांच्या विधानसभेत आम्हाला किमान ५० जागा मिळतील, असे राज्य भाजपचे प्रमुख सतपालसिंग सत्ती यांनी सांगितले. आम्ही मतदानानंतरच्या प्रतिक्रिया, पक्षविरोधी कारवाया यांचा आढावा घेतल्यानंतर ५० जागा जिंकून स्थिर सरकार स्थापन करू शकू, असे सत्ती म्हणाले.

Web Title: Opposition in the party, BJP's protesters protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.