शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे विरोधी पक्षांची अस्वस्थता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:49 IST

एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची मतदान प्रकिया आटोपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज फेटाळून लावले आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला देण्यात कमीत कमीत जागांचा विचार केला तरी विरोधकांचे आघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसत नाही, त्यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सर्वाधिक जागा दाखवण्यात आल्यानंतर काँग्रेसने हे अंदाज म्हणजे निव्वळ कल्पनाविस्तार आहे, असे म्हटले आहे. 23 मे रोजी येणारा खरा निकाल सत्ताधारी पक्षाला धक्का देणारा असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजांची खिल्ली उडवली आहे. हे अंदाज म्हणजे निवळ गॉसिप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. 'एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनीतीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलमधील अंदाजांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एक्झिट पोल जनतेच्या मनाचा कानोसा घेण्यास अपयशी ठरले आहेत. हे एक्झिट पोल चुकीचे ठरतील, कारण जमिनीवरील वास्तव वेगळेच आहे. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि केंद्राता गैरभाजपा सरकार बनेल, असा दावा नायडू यांनी केला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रात भाजपा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांना अजून, 2004 प्रमाणे निकाल लागण्याची अपेक्षा आहे. 2004 मध्ये केंद्रात वाजपेयी सरकास पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. तसेच काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनून डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. मात्र एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  निवडणुकीनंतर करण्यात आलेले एक्झिट पोल आणि पक्षाने घेतलेल्या अंतर्गत सर्वेचे आकडे सारखेच असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाने केलेल्या सर्वेनुसार गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ज्या राज्यांत विजय मिळवला होता. त्या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झालेली नाही. तसेच एनडीएने 230 पेक्षा अधिक जागा मिळवल्यास त्यांना सत्तेत येण्यापासून रोखणे कठीण होणार आहे. मात्र एनडीएला 230 पेक्षा कमी जागा मिळाल्यास काँग्रेसला किती जागा मिळतात यावर पुढील सत्तासमिकरण अवलंबून असेल.  

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलBJPभाजपाcongressकाँग्रेस