खुशामतखोरीला मोदींचा विरोध

By Admin | Updated: June 6, 2014 22:20 IST2014-06-06T22:20:59+5:302014-06-06T22:20:59+5:30

खुशमस्करी करण्याच्या संस्कृतीवर टीकास्त्र सोडताना भाजपाच्या खासदारांना त्यांनी आपले किंवा अन्य कोणत्याही नेत्याचे पाय न धरण्याची सूचना केली आहे.

Opposition to Modi | खुशामतखोरीला मोदींचा विरोध

खुशामतखोरीला मोदींचा विरोध

>खासदारांना सूचना : तळागाळात संपर्क ठेवण्याचे आवाहन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुशामतखोरीच्या संस्कृतीला विरोध केला आहे. खुशमस्करी करण्याच्या  संस्कृतीवर टीकास्त्र सोडताना भाजपाच्या खासदारांना त्यांनी आपले किंवा अन्य कोणत्याही नेत्याचे पाय न धरण्याची सूचना केली आहे. 
संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मोदींना भेटण्यासाठी भाजपाच्या खासदारांनी गर्दी केली होती. त्यातील जण त्यांच्या पाया पडत होते. त्यानंतर झालेल्या भाषणात मोदींनी हाजीहाजी संस्कृतीवर टीका केली. 
काही प्रादेशिक पक्षांमध्येही राजकीय कुटुंबातील व्यक्तीचे पाय धरण्याची परंपरा राहिली आहे. भाजपाने तर त्यावरून गांधी कुटुंबावर कायम टीका केली आहे. भाजपाच्या खासदारांनी शुक्रवारी प्रादेशिक पक्षांच्या संस्कृतीचे दर्शन घडविल्यानंतर मोदी म्हणाले की, माङो पाय धरू नका. लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही तुमचे कौशल्य, ज्ञान वृद्धिंगत करा. अधिकाधिक माहिती आणि ज्ञान मिळवून चांगले खासदार होण्याचा प्रयत्न करा. 
तळागाळातील लोकांशी संपर्कात राहण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. ज्या बळावर पक्ष सत्तेवर आला त्या कामगिरीला आत्मसंतुष्टतेचे ग्रहण लागू देऊ नका, असा खबरदारीचा सल्ला त्यांनी दिला. 
भाजपा आता विरोधी पक्ष राहिलेला नाही त्यामुळे आपल्या पक्षाच्या खासदारांवर मोठी जबाबदारी आली आहे. त्यांनी सरकारचा संदेश तळागाळात पोहोचवावा तसेच सरकारच्या कार्यक्रमांची माहिती जनतेला द्यावी, असे ते 2क् मिनिटांच्या भाषणात म्हणाले. 
सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासह अधिकाधिक उपस्थिती दाखवत कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4प्रसिद्धी माध्यमांशी पक्षप्रवक्ते या नात्याने न बोलता आपापल्या मतदारसंघातील मुद्यांकडे लक्ष वेधावे. संसदेतील चर्चेत सहभागी होताना योग्यरीत्या गृहपाठ करावा. ज्ञान आणि माहितीने सुसज्ज असावे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.
 
पक्ष खासदारांनी जनतेच्या कल्याणासाठी कायम झटत राहावे. दोन खासदारांपासून 282 र्पयत म्हणजे स्पष्ट बहुमताची मजल मारताना पक्षाला दीर्घ प्रवास करावा लागला आहे.
-लालकृष्ण अडवाणी, 
ज्येष्ठ नेते, भाजपा
 
मी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत करतो. त्यांनी सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आणि पक्षाला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी एकजुटीने काम करावे.
- राजनाथसिंह,
गृहमंत्री

Web Title: Opposition to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.