शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील विविध राजकीय विचारधारा आणि पक्षांनी एकत्र येत देशभक्तीपर कर्तव्य बजावले - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:10 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे.

opposition meeting in bangalore | बंगळुरू : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. बिहारची राजधानी पाटणा येतील बैठकीनंतर बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक होत आहे. या बैठकीला देशभरातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाप्रणित NDA असो अथवा काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA. विरोधी पक्षांच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली असून त्यांचा सोनिया गांधींसोबत चर्चा करत असतानाचा फोटो समोर आला आहे. 

विरोधकांच्या बैठकीतील काही फोटो शेअर करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले. "भारतातील विविध राजकीय विचारधारा आणि प्रदेशातील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्वोच्च देशभक्तीपर कर्तव्य बजावले आहे. आपल्या संविधानाचे आणि आपल्या लोकशाहीचे रक्षण करणे हेच हे कर्तव्य आहे", असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

तसेच भारतातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणू पाहणाऱ्या दिल्लीश्वरांविरुद्ध भारतभरातील महत्वाच्या सर्व पक्षांची एकी झाली असून त्या संबधातील महत्वाच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ह्यांच्यासोबत मी काल बंगळुरु येथे दाखल झालो. आजही देशभरातील महत्वाच्या नेत्यांशी दिवसभर येथे चर्चा होत असून लोकशाही वाचवण्यासाठी जे जे महत्वाचे आहे ते सर्व आम्ही करू. देशाला हुकूमशाहीच्या विळख्यातून बाहेर काढू, असेही ठाकरेंनी सांगितले.  आगामी लोकसभेसाठी विरोधकांची रणनीती अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने विजय मिळवून भाजपाला सत्तेतून बाहेर फेकले. याशिवाय हिमाचल प्रदेशातही कॉंग्रेसने विजय मिळवला. आगामी काळात मध्य प्रदेश, राजस्थान इथेही निवडणूक आहे. काँग्रेसची तिथेही जोरदार तयारी सुरू आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येत तडजोड करण्यास तयार आहे. त्यासाठी सोनिया गांधी देखील बंगळुरूत होत असलेल्या बैठकीत सहभागी झाल्या आहेत. या बैठकीत महत्त्वाचा प्रश्न असा की, विरोधी पक्षांची एकजूट २०२४ ला मोदींना हरवू शकेल का? विरोधकांची एकजूट निवडणुकीत टिकेल का? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज बंगळुरूत विरोधकांच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना