जेटलींविरुद्ध दिल्लीत निदर्शने
By Admin | Updated: August 23, 2014 01:24 IST2014-08-23T01:24:41+5:302014-08-23T01:24:41+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी शुक्रवारी जोरदार निदर्शने केली आणि देशातील महिलांची माफी मागण्याची मागणी केली.

जेटलींविरुद्ध दिल्लीत निदर्शने
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध महिला काँग्रेस कार्यकत्र्यानी शुक्रवारी जोरदार निदर्शने केली आणि देशातील महिलांची माफी मागण्याची मागणी केली.
त्यांची चुकीची मानसिकता आहे आणि हीच त्यांची वैचारिकता आहे. त्यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागायला हवी, अशी मागणी महिला काँग्रेस अध्यक्ष शोभा ओझा यांनी केली. महिला काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी जेटली यांचे निवासस्थान 9, अशोक रोडकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अडवले. आंदोलकांनी भाजपाविरोधी घोषणा दिल्या तसेच वरिष्ठ भाजपा
नेत्यांचे पुतळे जाळले. निहालचंद मेघवाल यांच्यावर बलात्काराचा आरोप असताना त्यांना
मंत्रिमंडळात ठेवल्याचा आरोप ओझा यांनी केला.
बलात्काराचा आरोप असलेले आसाराम बापू यांच्या जामिनासाठी काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवक्ता सलमान खुर्शीद यांनी न्यायालयात बाजू मांडल्याने त्यांना आज अडचणीच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. आपण अशा प्रकारच्या सामाजिक मुद्यांचा पैशात फायदा तोटय़ात विचार करू शकत नाही, असे खुर्शीद म्हणाले.
जेटली यांच्या वक्तव्यावर निर्भयाच्या आईने खेद व्यक्त केला. या वक्तव्याने मला खूप निराश केले आहे. त्यांनी निवडणुकीच्या काळात राजकीय लाभासाठी निर्भयाच्या नावाचा वापर केला आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर ‘छोटी घटना’ असल्याचे सांगत आहेत, असे त्या म्हणाल्या.