शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या सभात्यागाने राज्यसभेत रण; सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 07:58 IST

विरोधकांनी धोकादायक पायंडा पाडला; शपथेचा अनादर केला असं राज्यसभेचे सभापती यांनी म्हटलं तर खोटे बोलणे, दिशाभूल करणे ही पंतप्रधानांची सवय झाली आहे असा पलटवार विरोधकांनी केला.

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग करून विरोधकांनी लोकशाही मूल्यांच्या विरोधात एक धोकादायक पायंडा पाडला, अशी खंत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली. 

राज्यसभेच्या २६४ व्या सत्राच्या आपल्या समारोपाच्या भाष्यात धनखड यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या हौद्यात येणे हे संसदीय आचारसंहितेचा अपमान असल्याचे म्हटले. “आजचा त्यांचा सभात्याग अत्यंत क्लेशदायक होता. हा एक ऐतिहासिक प्रसंग होता. सहा दशकांनंतर पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत होते. असे असताना विरोधक त्यांच्या संवैधानिक नियमापासून दूर गेले आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधीत धोकादायक पायंडा पाडला,” अशी खंत धनखड यांनी व्यक्त केली.

त्यांनी संविधानाकडे पाठ फिरवलीविरोधकांनी सभात्याग केला नाही, तर प्रतिष्ठेचाही त्याग केला. आज त्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली नाही, त्यांनी भारतीय संविधानाकडे पाठ फिरवली.  आज त्यांनी माझा आणि तुमचा अनादर केला नाही तर राज्यघटनेसाठी घेतलेल्या शपथेचा अनादर केला आहे. भारतीय राज्यघटनेचा यापेक्षा मोठा अपमान होऊ शकत नाही. या वर्तनामुळे देशातील १४० कोटी जनता दुखावणार आहे. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, त्यांच्या अंतःकरणाचा शोध घ्यावा आणि कर्तव्य बजवावे असा सल्ला त्यांनी दिला.

हे लोक जन्मतःच संविधानाचे विरोधकखरगे म्हणाले की, भाजपने संविधान बनवलेले नाही. ते संविधानाच्या विरोधात आहेत. मला हा विषय त्यांच्यासमोर सभागृहात मांडायचा होता. 'ऑर्गनायझर'च्या संपादकीयात संविधानात भारतीय काहीही नसल्याचे म्हटले होते. जनसंघ व संलग्न संघटनांनी संविधानाला विरोध करून पंडित नेहरू,  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दहन केल्याचा दावाही खरगे यांनी केला. ते आम्हाला संविधानविरोधी म्हणत आहेत, तर हे लोक जन्मतःच संविधानाचे विरोधक आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदी