शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

विरोधक दिल्लीत एकत्र, राज्यांत मात्र मार्ग वेगवेगळा; राहुल गांधींच्या मुद्द्यावरून स्थानिक व्हाेटबॅंक गमाविण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 08:57 IST

प्रमुख प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांत काँग्रेससाेबत आघाडी करण्याची शक्यता सध्यातरी अंधुकच दिसत आहे.

- सुनील चावकेनवी दिल्ली : ईडी, सीबीआय, ईव्हीएम तसेच राहुल गांधींसह विरोधी पक्षनेत्यांविरुद्धच्या खटल्यांसारख्या निवडक मुद्द्यांवरून मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्ष दिल्लीत काँग्रेससोबत आक्रमक झाले आहेत; पण आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरुद्ध राहुल गांधी मैदानात कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रमुख प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांत काँग्रेससाेबत आघाडी करण्याची शक्यता सध्यातरी अंधुकच दिसत आहे.

खासदारकी रद्द झाली तरी आपण मोदी सरकारविरुद्ध लढतच राहू, या राहुल गांधींच्या विधानामुळे सपा, तृणमूल, वायएसआर काँग्रेस, बीजेडी, आरजेडी, जेडीयू, आप, जनता दल सेक्युलर, तेलंगण राष्ट्रसमिती, केरळमधील माकप-भाकप आणि एयूडीएफसारखे पक्ष काँग्रेसपासून दूर राहण्याची चिन्हे  आहेत. 

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींविरुद्ध राहुल गांधींचा मान्य नसलेला चेहरा आणि राज्यांमध्ये काँग्रेस मतांचे न होणारे हस्तांतरण यामुळे काँग्रेसशी समझोता करण्याची या पक्षांची तयारी नाही. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक नाहीत. अमेठी मतदारसंघात तसेच वेळ आली तर रायबरेलीमध्येही समाजवादी पक्षाने आपले उमेदवार उतरवण्याची तयारी चालवली आहे. 

रिक्त झालेल्या वायनाडमध्ये पाेटनिवडणुकीत डावी आघाडी आपला उमेदवार उतरवेल. काँग्रेस आणि ममता बनर्जींच्या तृणमूलमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे तेथे आघाडीची शक्यता धुसर आहे. बिहारमध्ये काँग्रेससाठी जागा सोडणे जोखमीचे ठरेल, असे राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे म्हणणे आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसशी युती केल्यास व्होटबँक गमावून बसावी लागेल, असे आम आदमी पार्टीच्या नेत्यांना वाटते. 

 प्रादेशिक पक्षांची मन:स्थिती वेगळी 

राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात दिल्लीत एकजूट झाले असले तरी हे प्रादेशिक पक्ष आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्रसमिती आणि जद सेक्युलरचा काँग्रेसऐवजी ममता बनर्जींसोबत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा कल आहे. त्या दृष्टीने त्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. या पक्षांचे वर्चस्व असलेल्या राज्यांमध्ये लोकसभेच्या २२५ हून अधिक जागा आहेत. तिथे अस्तित्व नगण्य असले तरी काँग्रेसने निवडणूक लढल्यास २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतविभाजनाचा फायदा भाजपला होऊ शकतो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस